आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साेनाळा येथे वृद्धाचा दगडाने ठेचून खून,साेन्याच्या अंगठीसाठी खून केल्याचा पाेलिसांचा अंदाज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जामनेर- तालुक्यातील साेनाळा येथील वृद्धाचा दगडाने ठेचून खून झाल्याची घटना शनिवारी सकाळी वाजेदरम्यान उघडकीस अाली. खुनाचे कारण समजू शकले नाही. मात्र, त्यांच्या हातातील १० ग्रॅम वजनाची साेन्याची अंगठी गहाळ झालेली अाहे.

साेनाळा येथील शिवाजी उखा पाटील (वय ८०) हे शुक्रवारी रात्री वाजेदरम्यान शाैचास जाताे म्हणून घरून निघाले. शनिवारी सकाळपर्यंत ते परतलेच नाही. रात्री कुटुंबीयांनी त्यांचा शाेध घेतला. मात्र, ते अाढळून अाले नाहीत. सकाळी पुन्हा शाेध घेतला असता, गावापासून एक किलाेमीटर अंतरावर एका खाेल नाल्यात त्यांचा मृतदेह अाढळून अाला. पाटील यांच्या डाेक्यात माेठा दगड मारला असून रक्ताच्या थाराेळ्यात ते पडले हाेते. पहूर पाेलिस ठाण्याचे सहायक पाेलिस निरीक्षक माेहन बाेरसे सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी पडलेला दगड पाहून माेहन बाेरसे यांनी श्वानपथकाला पाचारण केले. याबाबत अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे.

अायुर्वेदाची हाेती जाण
पाटीलयांना अायुर्वेदाची जाण हाेती. मूळव्याध लहान मुलांच्या अस्थमासाठी त्यांच्याकडे जडीबुटीचे रामबाण अाैषध हाेते. अाैषध देण्याच्या बहाण्यानेच त्यांना कुणीतरी गाडीवर बसवून नेले असावे, असे नातेवाइकांचे म्हणणे अाहे.

शिवाजी पाटील अंगठी गहाळ
पाटील यांचे उतारवय असल्याने लांबपर्यंत चालण्याची त्यांची क्षमता नाही. अशा परिस्थितीत त्यांना कुणीतरी माेटारसायकलवर बसवून पहूर शिवारातील शेतीकडे घेऊन गेले. खून केल्यानंतर त्यांच्या हातातील १० ग्रॅम वजनाची साधारणत: ३० हजार रुपयांची अंगठी काढून घेतली अाहे. त्या अंगठीसाठी पाटील यांचा खून झाला असावा, असा पाेलिसांचा अंदाज अाहे.
बातम्या आणखी आहेत...