आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चाेरीच्या आठ दुचाकी रांजणी येथून पकडल्या, दोन्ही चोर ताब्यात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जामनेर- जामनेर पोलिसांनी तालुक्यातील रांजणी या एकाच गावातून चोरीच्या आठ मोटारसायकली जप्त केल्या आहेत. याप्रकरणी जामनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून टाकळी येथील दोन्ही सराईत चोरट्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

टाकळी येथील रमेश चतरसिंग परदेशी त्याचा साथीदार महेंद्र श्यामलाल राजपूत हे दोघेजण चोरीच्या मोटारसायकली विकत असल्याची गोपनीय माहिती पोलिस निरीक्षक नजीर शेख यांना मिळाली. त्यानुसार शेख यांनी आपल्या सहकाऱ्यांना याबाबतची सविस्तर माहिती देऊन कामगिरी सोपवली. पोलिस उपनिरीक्षक कैलास वाघ, हवालदार जालमसिंग पाटील, राजेंद्र अडकमोल, कालीचरण बिऱ्हाडे, योगेश सुतार यांनी शुक्रवारी पहाटे चार वाजेपासून मोहीम राबवत मिळालेल्या माहितीच्या आधारे रांजणी येथून चोरीच्या गाड्या घेतलेल्यांच्या घरातून किंवा घरासमोरून सात मोटारसायकली जप्त केल्या. माहिती गोपनीय ठेवल्याने जवळपास सर्वच मोटारसायकली जप्त करण्यात आल्या असून आणखी काही गाड्यांचा शोध सुरू आहे. याबाबत जामनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघा संशयितांना अटक केली आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक कैलास वाघ करीत आहेत.

बनावटनंबरप्लेट
मिळालेल्यागोपनीय माहितीवरून जामनेर पोलिसांनी शुक्रवारी कारवाई करीत आठ मोटारसायकली जप्त केल्या. यातील बहुतांशी मोटारसायकली या विदर्भ मराठवाड्यातील असल्याचे नंबरप्लेटवरून दिसले. मात्र, काही गाड्यांच्या नंबरप्लेट बनावट असल्याची माहिती आराेपी परदेशी राजपूत यांनी पोलिसांना दिली. त्यामुळे येथील पाटील मोटार्सच्या मॅकेनिकलला बोलावून चेचिस नंबर घेण्यात आले. चेचिस नंबरच्या आधारे गाड्यांचे खरे नंबर शोधून त्या गाड्या कुणाच्या आहेत, याचा तपास केला जाणार आहे.

मोटारसायकली चाेरीची पुनरावृत्ती
शनिवारप्रमाणेचयापूर्वीही मोटारसायकली चोरून त्या अत्यल्प किमतीत विकल्या जात असल्याचा प्रकार आठ महिन्यांपूर्वी उघडकीस आला होता. तेव्हाही परदेशी राजपूत यांना आरोपी म्हणून अटक करण्यात आली होती. तेव्हा ढालगाव येथील विहिरीतून चार मोटारसायकली जप्त करण्यात आल्या होत्या. त्याचबरोबर शेंगोळा यात्रेतूनही तीन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या होत्या. दोघेही आरोपी टाकळी येथील असून मोटारसायकली चाेरीच्या प्रकरणात ते आता दुसऱ्यावेळेस अटक झाले आहेत.
बातम्या आणखी आहेत...