आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बस थांबवण्यावरून हाणामारी; पोलिस ठाण्यात दीड तास गोंधळ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- नवीन बसस्थानकात शुक्रवारी सायंकाळी वाजता पती लघुशंकेला गेले असताना पत्नी चुकून यावल एेवजी भादली बसमध्ये बसली. त्यानंतर थाेड्याच वेळात गाडी मार्गस्थ झाली. हे पाहून पतीने गाडी थांबवण्यासाठी अावाज दिला पण गाडी थांबली नाही. त्यामुळे त्याने रिक्षाने पाठलाग करून एसटी पाेलिस मल्टिपर्पज हाॅलजवळ थांबवली. त्यानंतर बसचालक प्रवासी महिलेचा पती यांच्यात फ्री- स्टाइल हाणामारी झाली. त्याचवेळी एमअायएमचे कार्यकर्ते घटनास्थळी पाेहाेचल्याने पुन्हा वाद उफाळला. हे पाहून पाेलिसांनी एसटी जिल्हापेठ पाेलिस ठाण्यात अाणली. तेथेही कार्यकर्त्यांनी गाेंधळ घातल्याने तणाव निर्माण झाला हाेता. जिल्हापेठ पोलिस ठाण्यात तब्बल दीड तास हा गोंधळ सुरू होता. त्यामुळे पाेलिसांनी एमआयएमच्या दोघांवर प्रतिबंधात्मक कारवाई करून नाेटीस बजावली अाहे.

खेडी- काेरपावली (ता.यावल) येथील मुराद पटेल हे पत्नी आशा यांच्यासाेबत यावल जाण्यासाठी शुक्रवारी सायंकाळी वाजता शहरातील नवीन बसस्थानकावर अाले हाेते. मुराद हे लघुशंकेसाठी गेले असता, आशा या नजरचुकीने भादलीला जाणाऱ्या एसटी बसमध्ये (एमएच २० डी ८३३१) बसल्या. ही बाब मुराद यांच्या लक्षात अाल्यानंतर त्यांनी गाडी थांबवण्यासाठी आवाज दिला. तसेच आशा यांनीदेखील वाहकाकडे गाडी थांबवण्याची विनंती केली. मात्र, बसचालक एकनाथ शंकर पाटील यांनी रस्त्यावरील वाहतुकीमुळे बस तत्काळ थांबवता पुढे नेली. तोपर्यंत मुराद हे रिक्षातून गाडीचा पाठलाग करत त्यांनी पोलिस मल्टिपर्पज हॉलजवळ बस थांबवली. त्यानंतर मुराद यांनी चालक पाटील यांना शिवीगाळ केली. याचा राग येऊन पाटील यांनीदेखील मुराद यांना शिव्या दिल्या. काही क्षणातच दोघांमधील वाद विकोपाला जाऊन फ्री -स्टाइल हाणामारीत झाले. या वेळी बसमधील प्रवाशांसह रस्त्यावरील इतर वाहनचालकांनी हा वाद मिटवला.

बसचालक अाणि मुराद यांच्यात वाद सुरू असताना काही जणांनी एमआयएम कार्यकर्त्यांशी संपर्क साधला. काही वेळानंतर घटनास्थळी एमआयएमचे काही कार्यकर्ते दाखल झाले. त्यानंतर पुन्हा बसचालक एमआयएम कार्यकर्त्यांमध्येही वाद सुरू झाला. हा वाद मिटवण्यासाठी पोलिसांनी बस जिल्हापेठ पोलिस ठाण्यात हलवली. एमआयएमचे कार्यकर्ते देखील पोलिस ठाण्यात पोहाेचले. काहीवेळानंतर बसचालक पाटील यांच्या समर्थनात काही एसटी चालक तर एमआयएमचे रेयान जहागीरदार, ऐनोद्दीन शेख, जिया बागवान हे देखील काही कार्यकर्त्यांसह पाेलिस ठाण्यात अाले. त्या वेळी एमआयएम कार्यकर्ते आणि एस.टी.कर्मचारी यांच्यात वाद सुरू झाला. एकमेकांच्या अंगावर धावून जाण्यापर्यंतचा प्रकार देखील घडला. त्याचवेळी पोलिस ठाण्याचे निरीक्षक श्याम तरवाडकर विशेष कमांडो पथक देखील पोहचले.

कमांडोंसमोर एमआयएम कार्यकर्त्यांनी तरवाडकर यांच्याकडे आपली बाजू लावून धरली. बसचालकाने आशा पटेल यांना मारहाण केल्याचा दावा एमआयएम कार्यकर्ते करीत होते. तर मुराद यांनीच आपल्याला मारहाण केली, असे चालक पाटील ठामपणे सांगत होते. एमआयएमचे कार्यकर्ते त्यांच्या बचावासाठी आपल्यावर खोटे आरोप करीत असल्याचे पाटील यांनी सांगितले. या प्रकारामुळे पोलिस ठाण्यात चांगलाच तणाव निर्माण झाला होता. शेवटी मुराद बसचालक पाटील यांच्यात समझाेता झाल्यामुळे वाद मिटला. त्यानंतर रात्री ७.३० वाजता एसटी भादलीला मार्गस्थ झाली. तक्रार दाखल झाली नाही.
एमआयएम कार्यकर्त्यांना नोटीस
तक्रारदारांचीइच्छा नसताना त्यांना भडकावून तक्रार देण्यास भाग पाडले. त्यामुळे वाद तणाव वाढला. या कारणामुळे एमआयएमचे रेयान जहांगीरदार ऐनोद्दीन शेख यांना जिल्हापेठ पोलिस ठाण्याकडून नोटीस देण्यात आली आहे. यापूर्वी देखील शहर पोलिस ठाण्याकडून त्यांना नोटीस देण्यात आली होती.

दोघांवर प्रतिबंधात्मक कारवाई
बसचालकतसेचप्रवासी यांच्यात वाद झाला होता. पोलिस ठाण्यात आल्यानंतर दोघांमध्ये समझाेता झाला. त्यांनी एकमेकांच्या विरोधात तक्रार दिली नाही. तर वाद वाढवण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांवर प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून नोटीस देण्यात आली आहे. श्याम तरवाडकर, पोलिसनिरीक्षक, जिल्हापेठ पोलिस ठाणे

प्रवासी चालकाच्या बाजूने
चूककाेणाची हे जाणून घेण्यासाठी पाेलिसांनी ठाण्याच्या अावारात उभ्या असलेल्या बसमधील काही प्रवाशांना बाेलावून विचारपूस केली. त्या वेळी प्रवाशांनी मुराद यांचीच चूक असल्याचे सांगितले. त्या वेळी एमआयएम कार्यकर्ते प्रचंड संतापले होते. त्यांनी आपलीच बाजू खरी असल्याचे सांगितले. पोलिसांनी प्रवाशांचे जबाब घेण्यासाठी त्यांच्या तिकिटांच्या झेरॉक्स काढून ठेवल्या आहेत. सायंकाळी ७.३० वाजता पोलिस निरीक्षक तरवाडकर यांच्या समक्ष दोन्ही पक्षांनी कोणाविरुद्ध तक्रार नसल्याचे लेखी लिहून दिले.
बातम्या आणखी आहेत...