आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Crime News In Marathi, Accused Attack On Police, Divya Marathi

पोलिसावर आरोपीने केला कुर्‍हाडीने वार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यावल- हातभट्टीवर छापा टाकण्यासाठी मोहराळा (ता.यावल) येथे गेलेल्या पोलिस कर्मचार्‍यावर आरोपीने कुर्‍हाडीने वार केल्याची घटना शनिवारी घडली. मात्र, कर्मचार्‍याने हा वार चुकवला.उपनिरीक्षकांसह इतर पोलिस कर्मचार्‍यांना कुर्‍हाडीचा धाक दाखवून जीवे ठार मारण्याची धमकी देणार्‍या दोघांना शनिवारी अटक झाली आहे.


उपनिरीक्षक कैलास वानखेडे, उपनिरीक्षक रोहन खंडागळे, हवालदार बी.बी.हिरे, राजेंद्र पाटील, अय्युब तडवी, किरण पाटील, चंद्रशेखर गाडगीळ, विजय जावरे, सागर पाठक यांचे पथक गावात गेले होते. पथकाने 1600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. कारवाईदरम्यान मोहन ऊर्फ रोहिदास रमेश अडकमोल याने पोलिसांसोबत अरेरावी केली. त्याने पोलिस कर्मचारी किरण पाटील यांच्यावर कुर्‍हाडीने वार केला. पाटील यांनी तो वार चुकवला. तत्काळ आरोपीच्या हातातील कुर्‍हाड हिसकावण्यात आली. त्याच्यासह शिवदास रमेश अडकमोल याला ताब्यात घेण्यात आले. दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.