आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Crime News In Marathi, Husband Kill His Wife Incident At Jalgaon, Divya Marathi

पतीकडून पत्‍नीचा कात्रीने भोसकून खून

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे- देवपुरातील नकाणेरोड परिसरातील आंबेडकरनगर या वसाहतीत राहणार्‍या योगिता घरटे या महिलेचा पतीने कात्रीने भोसकून खून केला. कौटुंबिक वादातून रविवारी रात्री हा प्रकार घडला. याबाबत पश्चिम देवपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते.

आंबेडकरनगर या वसाहतीत राहणार्‍या योगिता दिनकर घरटे (27) व तिचा पती दिनकर उत्तम घरटे यांच्यात रविवारी वाद झाला. या वादातून संतप्त झालेल्या दिनकरने कात्रीने योगिताच्या छातीवर, पाठीवर वार केले. हा प्रकार लक्षात आल्यावर अविनाश घरटे यांनी तिला धुळे जिल्हा रुग्णालयात दाखल केले. प्रकृती बिघडल्यामुळे तिला खासगी रुग्णालयात नेण्यात आले ; परंतु तेथील डॉक्टरांनी उपचारास नकार दिल्यामुळे तिला पुन्हा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले ; परंतु उपचारादरम्यान योगिताचा मृत्यू झाला होता. दिनकर हा गॅरेजवर कामाला आहे. या दांपत्याला सुमारे चार वर्षांचा मुलगा आहे. दिनकर हा पिंपळनेर येथील रहिवासी आहे. तर योगिताचे माहेर धुळय़ातील आहे.

काही महिन्यांपूर्वीच हे दांपत्य आंबेडकरनगरात राहण्यास आले होते. सुमारे आठवडाभरापासून दिनकर व योगिता यांच्यामध्ये वाद सुरू होता, अशी माहिती परिसरातील नागरिकांनी दिली आहे. पश्चिम देवपूर पोलिसांनी त्याला दुजोरा दिला आहे.

मारेकरी ताब्यात..
खुनाची माहिती मिळाल्यानंतर पश्चिम देवपूर पोलिस अवघ्या काही वेळात दाखल झाले. घटनास्थळावरून पसार झालेल्या दिनकरला काही वेळातच पोलिसांनी ताब्यात घेतले, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.