आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Crime News In Marathi, Income Tax Department, Divya Marathi, Gold Market

निवडणुकीतील मोठी कारवाई; 58 किलो सोन्याची बिस्किटे जप्त

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - धुळे शहरापासून सुमारे 19 किलोमीटर अंतरावर निवडणूक शाखेच्या भरारी पथकाने रविवारी दुपारी 58 किलो 900 ग्रॅम सोने जप्त केले. त्यानंतर आयकर विभागाला पाचारण करण्यात आले. शिरपूरच्या झी गोल्ड रिफायनरीतून मुंबईच्या बाजारात हे सोने नेले जात होते. या सोन्याची बाजारातील किंमत 16 कोटी 87 लाख आहे. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत तपासणी सुरू होती.


शिरपूरकडून मुंबईच्या दिशेने जाणार्‍या पांढर्‍या रंगाच्या सिक्युर्ड लॉजेस्टिक स्पेशालिस्ट असा उल्लेख असलेल्या एका वाहनात सोन्याची बिस्किटे असल्याची माहिती भरारी पथकाला मिळाली होती. त्यानुसार सोनगीर टोलनाक्याजवळ ही व्हॅन (एमएच04/जीसी 8213) अडविण्यात आली. या वाहनाच्या मागावर शिरपूरपासून पथकातील एक वाहन होते. चालकाकडे विचारणा केल्यावर त्याने समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. त्यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षक अखिलेशकुमार सिंग, आयकर विभागाचे अधिकारी ए.डी. निकुंभ, प्रांत विठ्ठल सोनवणे आदी पथकासह दाखल झाले. तोवर सोनगीरचे पोलिस अधिकारी प्रदीप देशमुख यांनी हे वाहन पोलिस ठाण्यात आणले. वाहनात सुमारे 58 किलो 900 ग्रॅम बिस्कीटच्या स्वरूपातील सोने असून ते खोक्यात ठेवण्यात आले होते. शिरपूर येथील झी गोल्ड रिफायनरी येथून मुंबईच्या बाजारात हे सोने नेले जात होते, अशी माहिती वाहन चालकाने पोलिस व आयकर विभागाला दिली. दरम्यान, यानंतर रिफायनरीचे मॅनेजर सुभाष पारेख हे दाखल झाले. त्यांनी सोबत आणलेली कागदपत्रे आयकर विभागाला दाखविली. तसेच आपली बाजू मांडली. निवडणूक काळात होत असलेल्या वाहनाच्या तपासणीमुळे व्यापारीवर्ग त्रस्त झाला आहे.


आमचा संबंध नाही
शिरपूरमध्ये सोन्याचा कारखाना उभारला. मात्र, गेल्या दोन वर्षांपूर्वीच या कारखान्याची विक्री झालेली आहे. झी ग्रुपचे सुभाष गोयल यांना गेल्या दोन वर्षांपूर्वी कारखाना विकला आहे. त्यामुळे त्याच्याशी पटेल ग्रुपचा काहीही संबंध नाही. अमरीश पटेल, आमदार