आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पोलिस इन अॅक्शन १७ घरफोड्या उघड, लाखांचा मुद्देमाल हस्तगत; दोघे फरारच

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - गेल्याकाही दविसांपासून होत असलेल्या घरफोड्यांमुळे पोलिसांपुढे आव्हान उभे ठाकले असताना पोलिसांनी धडक कारवाइर् करीत आठवडाभरात शहर आणि जिल्ह्यातून नऊ चोरट्यांना अटक केली आहे. हे सर्व चोरटे सध्या पोलिस कोठडीत असून, त्यांच्याकडून शहर जिल्ह्यातील १७ घरफोड्या उघड झाल्या आहेत. तसेच त्यातील १० घरफोड्यांमधील काही मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक डॉ.जे.डी.सुपेकर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
उर्वरित सात घरफोड्यांतील मुद्देमाल हस्तगत करणे बाकी आहे. त्यसाठी आरोपींना घटनास्थळी घेऊन गेल्यानंतर हस्तगत मुद्देमालाचा आकडा आणखी वाढणार आहे. तसेच या चोरट्यांचे दोन साथीदार अद्यापही फरार आहेत. गेल्या महिन्यात जिल्हाभरात घरफोड्यांचे प्रमाण वाढले होते. त्या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षकांनी उपअधीक्षक बच्छाव स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक प्रभाकर रायते यांच्या पथकांना विशेष सूचना देऊन तपासाला गती दिली होती. त्यानुसार एलसीबीच्या पाच पथकांनी कारवाई करीत नऊ चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या. उर्वरित दोन चोरट्यांच्या शोधासाठी एक पथक उत्तर प्रदेशकडे रवाना झाले आहे. या धडक कारवाईमुळे घरफोड्यांंवर नियंत्रण मिळवणे शक्य झाले आहे. याशिवाय ही कामगिरी करणाऱ्या पथकांना पोलिस अधीक्षकांनी २५ हजार रुपयांचे बक्षीसही जाहीर केले आहे.
अटकेतील आरोपी
किरणरतन गुजर (पारोळा), इरफान हारुन शेख (नानवाली, नािशक), भूषण रमेश बोडारे (उमाळा, ता.जि.जळगाव), अरबाज दाऊद पिंजारी (जळगाव), मोहंमद मुश्ताक मोहंमद लतीफ (अशोक विहार, जमालगपूर, ता.गाझियाबाद, उत्तर प्रदेश), आसिफ नूरमोहंमद (अकबरपुरा, सेनेटी ठाणा, कैराने, उत्तर प्रदेश), भिकनशाह रहेमतशाह (मलकापूर), इम्रान शेख खाटीक ( जळगाव), रामेश्वर इंगळे (वाकोडी, ता.मलकापूर), तर राजेश शर्मा (अयोध्या, उत्तर प्रदेश) आणि राजू राऊत (जालना) हे दोघे अद्याप फरार आहेत.

इरफान शेख गुजरकडून तीन ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, ३५ ग्रॅमचे मंगळसूत्र, चार ग्रॅमचे कानातील टोंगल, तीन सोन्याचे मणी, ५.५ ग्रॅमच्या कानातील रिंगा, बोडारे पिंजारीकडून ४० सोन्याचे मणी, चांदीचे दागिने, ओनिडा कंपनीचा टीव्ही, मोटारसायकल, भिकनशाह, खाटीक इंगळेकडून रंगीत टीव्ही, दोन घड्याळे. तसेच जळगाव शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून चोरीस गेलेली एक सिबीझेड मोटारसायकल चोपडा शहरातून चोरीस गेलेली स्प्लेंडरही हस्तगत करण्यात आली आहे.

उघड झालेल्या घरफोड्या
रामानंदनगरहद्दीतील एका घरफोडीतून एक लाख ७७ हजार, तालुका हद्दीतील घरफोडीतून १५, जिल्हापेठच्या हद्दीतील घरफोडीतून १९ हजार २००, एमआयडीसी हद्दीतील चार घरफोड्यांतून तीन लाख ४३ हजार ३५०, धरणगाव ३१ हजार ५०, एरंडोल २७ हजार ५०० आणि चाळीसगावातून १० हजार अशा १० घरफोड्यांतून पाच लाख ८७ हजार १०० रुपयांचा ए ेवज चाेरला होता. याशिवाय वरणगावातील तीन, पाचोऱ्यातील एक, निंभोऱ्यातील एक आणि चाळीसगाव येथील दोन अशा सात घरफोड्यांचीही चोरट्यांनी कबुली दिली आहे.