आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Crime News In Marathi, Married Women Abuse Issue At Jalgaon, Divya Marathi

विवाहितेचा छळ; सहा जणांविरुद्ध गुन्हा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यावल- शहरातील महाजन गल्ली भागातील माहेर असलेल्या 25 वर्षीय विवाहितेचा पैशांसाठी छळ केल्याप्रकरणी पतीसह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
पीडित विवाहिता सुषमा विजय शिनकर (बारी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचे लग्न 2005 मध्ये झाले होते. तेव्हापासून पती विजय पांडुरंग शिनकर(बारी) सासू विमलबाई पांडुरंग शिनकर, जेठ गजानन पांडुरंग शिनकर, जेठाणी उषाबाई गजानन शिनकर, जेठाणीचे दोन भाऊ संजय रतिलाल खलसे व सुनील रतिलाल खलसे (सर्व रा. सूरत) यांनी घर घेण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत, या मागणीसाठी मानसिक व शारीरिक छळ केला. याप्रकरणी विवाहितेच्या फिर्यादीवरुन यावल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पुढील तपास हवालदार संजय पाटील, नीलेश बडगुजर करत आहेत.