आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Crime News In Marathi, Police, Corporator, Divya Marathi

सोन्याची पोत लांबवली; तिघा संशयितांमध्‍ये नगरसेविकेच्या मुलाचा समावेश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - फालकनगरातील महिलेची सोन्याची पोत लांबवल्याप्रकरणी बाजारपेठ पोलिसांनी आकाश निकम, बंटी उर्फ खुशाल गजानन बोरसे आणि शेख इम्रान शेख अजिजुल रहेमान या संशयित आरोपींना रविवारी अटक केली. संशयितांमधील आकाश निकम हा भुसावळच्या नगरसेविका नंदा निकम यांचा मुलगा आहे.

फालकनगरातील विजयकुमार बोरसे यांच्या बहिणीची पोत दोन युवकांनी 11 एप्रिलला लांबवली होती. संबंधित महिला घराबाहेर उभी असताना मोटारसायकलवरील एका युवकाने बळजबरीने पोत तोडली. त्यानंतर दोघे मोटारसायकलवरून पसार झाले होते. याप्रकरणी बोरसे यांनी बाजारपेठ पोलिस ठाण्यात शनिवारी रात्री दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला. हवालदार राजेंद्र साळुंखे तपास करत आहेत.

पोलिस निरीक्षक सतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार आनंदसिंग पाटील, संदीप पालवे, रमेश चौधरी आणि शरद भालेराव यांनी तिन्ही आरोपींना रविवारी अटक केली. सोमवारी आरोपींना न्यायालयात हजर केले जाणार असून तिघांना पोलिस कोठडी मिळावी, अशी मागणी पोलिस करणार आहेत. आरोपींकडून आणखी काही गुन्ह्यांचीही माहिती मिळणार आहे, असे हवालदार आनंदसिंग पाटील यांनी सांगितले.