आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Crime News In Marathi, Rape Issue At Dhule, Divya Marathi

शेतमजुराच्या पत्‍नीवर बलात्कार; एकास अटक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - तालुक्यातील तामसवाडी शिवारात तान्हुल्याला ओलीस ठेवून त्याच्या मातेवर बलात्कार करण्यात आला. त्यानंतर पसार झालेल्या सुरेश पावरा याला सोनगीर पोलिसांच्या पथकाने चोपड्यात अटक केली. तर पीडित 21 वर्षीय विवाहितेच्या तक्रारीवरून सोनगीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिरपूर तालुक्यातील दाम्पत्य शेतमजुरीसाठी तामसवाडी येथे आले आहे. कौठळच्या राजू बोरसे यांच्या शेतात हे दाम्पत्य मजुरी करते. या दाम्पत्याला तीन महिन्यांचे बाळ व एक दोन वर्षांचा मुलगा आहे. या शेतापासून काही अंतरावर कीर्तिवत कौठाळकर यांच्या शेतात चोपडा तालुक्यातील विरवाडे गावातील सुरेश पावरा हा शेतमजुरी करतो. पीडितेच्या कुटुंबीयांशी सुरेशचा परिचय असल्यामुळे तो बुधवारी या पीडित महिलेच्या पतीसोबत कामानिमित्त शहरात आला होता. सुरेश पीडितेच्या पतीला सोडून पुन्हा तामसवाडीला आला. पीडित महिलेच्या घरी जाऊन त्याने तुझा पती रात्री उशिराने येईल, त्यामुळे तू आमच्या वस्तीवर चल, असे सांगितले. महिलेने त्यास नकार दिल्यावर सुरेशने मुलांना उचलून घेत महिलेला येण्याचा आग्रह धरला. संबंधित महिला येण्यास तयार नसल्यामुळे त्याने दोन्ही मुलांना ठार मारण्याची धमकी देऊन त्याने बलात्कार केला. रात्री 10 वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. त्यानंतर सुरेश पसार झाला. महिलेचा पती परत आल्यावर भेदरलेल्या महिलेने सर्व प्रकार सांगितला. यानंतर तिच्या पतीने ही त्याचा शोध घेतला असता तो मिळून आला नाही. त्यानंतर पीडित महिलेने गुरुवारी रात्री उशिराने सोनगीर पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यावरून सुरेश पावरा विरुद्ध भादंवि कलम 376 (1),506 नुसार गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

सुरेशला केली अटक.
गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांचे पथक लागलीच चोपडा येथे रवाना झाले. या पथकाने विरवाडे शिवारात शोध घेतल्यानंतर सुरेश मिळून आला. त्याला अटक करण्यात आली आहे. पीडित महिलेची शुक्रवारी धुळे जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली.