आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Crime News In Marathi, Standard Eight Girl Student Committeed Suicide

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आठवीच्या विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - शिंदखेडा तालुक्यातील बेटावद गावातील अश्विनी कोळी या आठवीच्या विद्यार्थिनीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत नरडाणा पोलिस ठाण्यात नोंद केली आहे. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.
बेटावद येथील जनता विद्यालयाची विद्यार्थिनी असलेली अश्विनी किशोर कोळी (13) काल शनिवार असल्यामुळे लवकर घरी आली. घरातील मंडळी कामाला गेली असताना तिने ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. अश्विनीच्या पश्चात आई-वडील, दोन भाऊ असा परिवार आहे. तिचा मोठा भाऊ दहावीला असून, लहान भाऊ हा इयत्ता पाचवीचा विद्यार्थी आहे.


‘ताई’च्या गळ्यात ओढणी
अश्विनीच्या घराजवळ काही बालके तिला ‘ताई’ म्हणायचे. तिच्या घराजवळ ही बालके खेळत होती. ओढणीने गळफास घेतलेला तिचा मृतदेह सर्वप्रथम त्यांना दिसला. ‘ताईच्या गळ्याला ओढणी बांधली आहे’ असे त्यांनी सांगितल्यावर हा प्रकार उघड झाला.