आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Crime News In Marathi, Theft For Enjoy Issue At Jalgaon, Divya Marathi

मौजमस्तीसाठी चोरी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- धरणगाव येथील भास्कर प्रभाकर बर्‍हाटे यांच्या हातातून पैसे ठेवलेली बॅग पळवणारे आरोपी बबलू सुभाष नवले व अजय बिरजू गारुंगे या दोघांसह अन्य तीन जणांनी मौजमस्ती करण्यासाठी चोरीचा मार्ग स्वीकारल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. मंगळवारी गारुंगे आणि नवले यांना पोलिसांनी अटक केली. त्यांनी 30 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. या दरम्यान दोघांनी गुन्ह्यांची कबुली दिली.
धरणगाव येथून 1 लाख 50 हजार रुपये तसेच पाचोरा येथून 1 लाख 70 हजार रुपये वाहनांच्या डिक्कीतून काढून घेतल्याची कबुली दिली आहे. तसेच धुळे, नंदुरबार, शहादा या ठिकाणीही अनेक लोकांच्या गाडीच्या डिक्कीतून, हातातून पैशांनी भरलेल्या बॅग पळविल्याचे त्यांनी सांगितले. दोघांसह अजय दहियेकर उर्फ टारझन, गोपाल नेतलेकर, विकास राजू गुमाने उर्फ हाड्या यांच्यासोबतही काही चोर्‍या केल्याचे त्यांनी सांगितले आहे. पोलिस आता या तिघांचाही शोध घेत आहेत. दरम्यान धरणगाव येथे जानेवारी महिन्यात गारुंगे याने एका गाडीच्या डिक्कीतून दीड लाख रुपये लंपास केले होते. या पैशातून त्याने नवीन दुचाकी खरेदी केली असल्याचे सांगितले तर उरलेले 20 हजार रुपये वसीम नावाच्या एका मित्राला उसनवार दिले होते. पोलिसांनी वसीमलाही ताब्यात घेतले आहे. रविवारी त्यांची पोलिस कोठडी संपल्यानंतर पोलिसांनी दोघांना न्यायालयात हजर केले होते. दोघांना आता पाचोरा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.