आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Crime News In Marathi,CCTV Camera, Divya Marathi

बेरोजगाराने चोरला सीसीटीव्ही कॅमेरा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - नगरसेवक कैलास नारायण सोनवणे यांच्या शनिपेठ रिधुरवाडा येथील घराच्या बाहेर लावलेला सीसीटीव्ही कॅमेरार्‍याची गुरुवारी पहाटे चोरी झाली. चोरटा सोहेल शेख (वय 23, रा.मणियार मोहल्ला) याला शनिपेठ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, चोरटा सोहेल हा सुशिक्षित असल्याची माहिती समोर आली आहे. दोन वर्षांपूर्वी इकरा संस्थेच्या कनिष्ठ महाविद्यालयातून तो बारावी सायन्स शाखेतून उत्तीर्ण झाला आहे.
सध्या बेरोजगार असल्यामुळे तसेच दुचाकी घेण्यासाठी पैसे नसल्यामुळे त्याचे घरी भांडण झाले. या मनस्तापातूनच गुरुवारी पहाटे 2.43 वाजेच्या सुमारास सोनवणे यांच्या घराच्या मागच्या दरवाजावर लावलेला सीसीटीव्ही कॅमेर्‍याची चोरी केली, असे त्याने पोलिस तपासात सांगितले आहे.
चोरी करीत असतानाच्या हालचाली कॅमेर्‍यात टिपल्या गेल्या आहेत. सकाळी 7 वाजता कॅमेर्‍याची चोरी झाल्याचे सोनवणे यांच्या लक्षात आल्यानंतर, त्यांनी डीव्हीआर मशीन तपासल्यानंतर चोरट्याचे व्हिडिओ चित्रण दिसले. तो त्याच परिसरातील रहिवासी असल्यामुळे काही तासातच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. याप्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वडील शिक्षक असल्याची माहिती सोहेलने दिली आहे.