आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Crime News In Marathi,Judges, Police Officers, Divya Marathi

पोलिस उच्चाधिकारी शेजारी; तरीही न्यायाधीशांकडे चोरी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - मागच्या बाजूला पोलिस उपअधीक्षकांचा बंगला आणि अवघ्या 200 मीटर्सवर अप्पर पोलिस अधीक्षकांचा बंगला असतानाही निर्ढावलेल्या चोरट्यांनी थेट न्यायाधीश डी.पी. सुराणा यांच्या बंगल्यात शिरून सोने-चांदीचे दागिने चोरून नेले. रविवारी रात्री चोरट्यांनी हा कार्यभाग उरकला.
भर रस्त्यात महिलांची सोनसाखळी ओढून नेण्याचे प्रकार वाढले असताना जळगावकरांना पोलिसांचाच काय तो आधार वाटत होता; पण वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांच्याच सहवासात राहाणार्‍या न्यायाधिशाच्या घरीही चोरी झाल्यामुळे पोलिस यंत्रणेच्या अस्तित्वावरच प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.
जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधिश डी.पी. सुराणा हे महाबळ मार्गावर असलेल्या हॉटेल रॉयल पीलेसच्या समोर राहातात. त्यांच्या बंगल्याची आणि पोलीस उपअधीक्षक एन. अंबिका यांच्या बंगल्याची कुंपणभिंत एकच आहे. सुराणा यांच्या बंगल्यापासून अवघ्या 200 मीटर अंतरावर अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांचा बंगला असून त्यांच्या शेजारी पोलीस अधीक्षकांचे निवासस्थान आहे. न्यायाधिश सुराणा यांची नुकतिच बदली झाली असून ते मुंबई येथे गेले आहेत. त्यांच्या बंगल्याच्या लाकडी दाराला ड्रील यंत्राने छिद्र करून कडी उघड्यात आली होती. सकाळी त्यांचे शिपाई व्ही.आर.आगळे यांच्या लक्षात चोरीचा प्रकार आला आणि नंतर पोलिसांना माहिती मिळाली.
पुढे वाचा....