आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Crime News In Marathi,theft Issue At Jalgaon, Divya Marathi

दारूच्या खर्चासाठी बनला चोर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- मित्रांबरोबर दारू पिण्यासाठी भासणारी पैशांची चणचण दूर करण्यासाठी चोरी करण्याची सवय जडली.. तसेच भुरट्या चोर्‍या करता-करता जबरी चोरी करण्यापर्यंत हिंमत वाढली.. शिक्षकपुत्र असलेल्या स्वप्निल केदारने जिल्हापेठ पोलिसांना दिलेल्या या कबुली जबाबाने सारे थक्क झाले.

शहरात सोनसाखळी चोर्‍यांपाठोपाठ होणार्‍या जबरी चोरीच्या घटनांनी पोलिस यंत्रणा हतबल झाली होती. संशयित म्हणून पकडलेल्या या दोन तरुणांनी पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर दिलेल्या कबुलीने पोलिस अवाक् झाले. रामानंदनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत 27 एप्रिल रोजी एकलव्य क्रीडा संकुलाजवळ तरुणास लुटल्याचे व त्यापाठोपाठ 1 मे रोजी जिल्हापेठ ठाण्याच्या हद्दीतील भास्कर मार्केटसमोर असाच प्रकार केल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. स्वप्निल केदार (मुंदडानगर) आणि गोविंद भगीरथ राठोड (रा.समतानगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
जिल्हापेठ पोलिसांचा तपास
गुरुवारच्या घटनेनंतर जिल्हापेठ पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक जे.आर.शेख यांच्यासह अनिल पाटील, राजेश मेढे यांच्या पथकाने शुक्रवारी केदार आणि राठोड या दोघांना ताब्यात घेतले. शुक्रवारी त्यांना न्यायालयात हजर केले होते असता, रविवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. कोठडीदरम्यान त्यांची चौकशी केली असता, दोघांनी यापूर्वीही असे प्रकार केल्याची कबुली दिली.
मनोज पाटीलने ओळखले दोघांना
केदार आणि राठोडने दिलेल्या कबुलीनंतर जिल्हापेठ पोलिसांनी मनोज पाटील याला बोलावून दोघांची ओळख पटवली. या दोघांनीच आपला मोबाइल आणि 500 रुपये पळवले असल्याचे पाटीलने ओळखले. दरम्यान, या दोन्ही चोरट्यांनी 28 एप्रिल रोजी पाटील याला भेटून पुन्हा पैशांची मागणी केली होती.
घटना- 1 : गुरुवार, 17 एप्रिल रोजी बांभोरी अभियांत्रिकीत द्वितीय वर्षाला शिकत असलेला अंकुश श्रीरामे हा मित्रासह एकलव्य क्रीडा संकुलाजवळून जात असताना तेथे तीन युवक दुचाकीने आले. त्यांनी र्शीरामेसह त्याच्या मित्राला बेदम मारहाण केली. मोबाइल आणि 3,000 रुपये रोख लंपास केले.
घटना- 2 : रविवार, 27 एप्रिल रोजी मूजे महाविद्यालयाच्या वसतिगृहातील मनोज दिलीप पाटील या विद्यार्थ्याच्या खिशातून 500 रुपये आणि मोबाइल पळवल्याचेही या दोघांनी कबूल केले. विशेष म्हणजे, त्यांनी बारी यांना आपण एलसीबीचे पोलिस असल्याचे सांगितले होते