आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Crime News In Marathi,Wife Hasaband Quarrel, Divya Marathi,Jalgaon

पत्नी पोलिस ठाण्यात, पतीची घरी आत्महत्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - मुलाच्या जावळाचा कार्यक्रम झाल्यावर मंगळवारी पती-पत्नीमध्ये वाद झाला. या वादानंतर रात्री आठ वाजता पत्नी पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यासाठी गेली. त्यानंतर रात्री 11 वाजता पतीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
अयोध्यानगरातील अनिल धनराज जैन (वय 30) यांचा मुलगा जैनम (11 महिने) यांचा जावळाचा कार्यक्रम मंगळवारी झाला. कार्यक्रम आटोपल्यानंतर सायंकाळी पत्नी भाग्यश्रीशी अनिल यांचा घरगुती कारणावरून वाद झाले. त्यामुळे भाग्यश्री रात्री 8 वाजता घरातून निघून गेली. त्या रात्री 10.30 वाजेच्या सुमारास एमआयडीसी पोलिस ठाण्यात पोहोचली. पोलिसांना पतीने मारहाण केल्याचे सांगत तक्रार दाखल करायची असल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी भाग्यश्रीकडून अनिल जैन यांचा मोबाइल नंबर घेतला. तो बंद असल्यामुळे अनिलचे मोठे भाऊ लालचंद जैन यांचा नंबर घेऊन त्यांना फोन केला. तेवढय़ात अनिल यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली असून आम्ही सर्वजण आता सामान्य रुग्णालयात असल्याची माहिती लालचंद यांनीच पोलिसांना दिली.
दोन वर्षांपूर्वीच झाले लग्न : अनिल आणि भाग्यश्री यांचे दोन वर्षांपूर्वीच लग्न झाले होते. तसेच दोन महिन्यांपूर्वीच त्यांनी अयोध्यानगर येथे घर घेतले होते. घराच्या शेजारीच धनकुश नावाने औषधांचे दुकान होते. अनिल यांचे आई-वडील आणि मोठे भाऊ लालचंद हे रामेश्वर कॉलनी येथे राहतात. त्यांचेही औषधांचे दुकान आहे.
याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अद्याप कोणीही तक्रार दिलेली नाही. मात्र मृताचा मोबाइल मिळून आला आहे. त्याने काही जणांना एसएमएस करून आत्महत्या करीत असल्याचे एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बी.के.कंजे यांनी सांगितले.
आत्महत्येपूर्वी एसएमएस
अनिल जैन यांनी गळफास घेण्याच्या काही मिनिटे अगोदर काही जणांना एसएमएस केले. त्यात आपण आत्महत्या करणार असल्याचे म्हटले. आत्महत्येस कारणीभूत ठरणार्‍यांचाही उल्लेख एसएमएसमध्ये केला होता. शेजारी राहणार्‍या एका व्यक्तीने हा एसएमएस वाचल्यानंतर त्यांचे घर गाठले होते. मात्र तोपर्यंत त्यांनी गळफास घेतला होता.