आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्यावसायिकाकडून १५ लाखांची रोकड लुटली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुक्ताईनगर- तांब्याचीतार देण्याचे कारण सांगून तालुक्यातील चारठाणा परिसरात १० ते १२ जणांच्या टोळीने, पुण्यातील व्यावसायिकाकडून १५ लाख रुपये लुटल्याची घटना एप्रिलला घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, घाणखेड (ता.बोदवड) येथील रहिवासी पुणे येथे मिरॅकल डाइड अॅण्ड टूल्स या कंपनीत काम करणारे भगवान विष्णू चोपडे यांना कंपनीच्या कामासाठी कॉपर (तांबे) हवे होते. चारठाणा परिसरात तांबे विकत मिळते, अशी माहिती चोपडे यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी चारठाणा परिसरातील गजानन, रवी आणि भोसले (पूर्ण नाव माहित नाही) यांच्याशी संपर्क साधला. माल घेण्यासाठी चारठाण्यापासून ३० ते ४० किमी अंतरावर जावे लागेल, असे चोपडे यांना सांगण्यात आले. एप्रिलला चोपडे आपल्या चारचाकीने तिघांसह कुऱ्ह्याकडे निघाले होते. त्याचवेळी ते १० जणांनी त्यांचे वाहन अडवून, १५ लाख रुपये रोख, मोबाइल, लॅपटॉप, आयपॅड असे साहित्य हिसकावून पोबारा केला. याप्रकरणी चोपडे यांच्या फिर्यादीवरून १२ जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस उपनिरीक्षक सचिन इंगळे तपास करत आहेत.