आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाचोऱ्यात छेडखानी; आरोपीस अटक, जमावाचा संताप; अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाचोरा- देशमुख वाडीभागातील एका २३वर्षीय युवतीची छेडखानी दुसऱ्या गटातील तरुणाने केली. यामुळे शहरात तणावपूर्ण शांतता असून, अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात केला. याप्रकरणी पोलिसांत विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला असून, संशयित आरोपीस नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. ही घटना रविवारी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली.

देशमुखवाडीतील युवती सकाळी प्रातर्विधीसाठी बाहेर गेली होती. घरी परतत असताना याच भागातील संशयित आरोपी वसीम शेख यासीन कसाई याने त्या युवतीचा पाठलाग केला. अश्लील शेरेबाजी करत तिचा विनयभंग केला. यामुळे संतप्त युवतीने पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी संशयित युवकाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला; परंतु हा युवक पसार झाला. त्यामुळे पोलिसांनी त्याच्या वडिलास ताब्यात घेतले. त्या गटातील काही व्यक्तींनी त्या युवकास पकडून चोप दिला. नंतर त्यास पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी त्यास अटक केली आहे. या घटनेबाबत शहरात कळताच परिसरात जमावाने संताप व्यक्त केला.

घटनास्थळाची पाहणी
घटनेचेगांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी पिंपळगाव, पहूर, भडगाव, जामनेर येथील पोलिस ताफा बोलावून अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला. घटनास्थळाची पाहणी डीवायएसपी रमेश गावित यांनी केली. पोलिस निरीक्षक नवलनाथ तांबे, सहायक निरीक्षक अविनाश आंदळे, एस.एस.सानप, आर.आर.भोर, नितीन सूर्यवंशी, गजू काळे, राजू सोनवणे, राहुल बेहरे आदींनी परिस्थिती नियंत्रणात आणली.
बातम्या आणखी आहेत...