आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पिंप्राळा-हुडकाे दंगलीतील संशयितांना काेठडी, जळगावमधील प्रकार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- पिंप्राळा-हुडकाे दंगलीतील संशयितांच्या पाेलिस काेठडीची मुदत शनिवारी संपली. त्यांना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी अार.बी.ठाकूर यांच्या न्यायालयात हजर केले असता, त्यांनी न्यायालयीन काेठडी सुनावली. तसेच संशयितांतर्फे जामीन अर्ज सादर केल्यानंतर अटी शर्ती ठेवून जामीन देण्यात अाला.

पिंप्राळा हुडकाेतील दंगलप्रकरणी शेख जावेद शेख लुकमान यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उज्ज्वला रमेश शिरसाळे (वय ३५), दीपक युवराज साेनवणे (वय ३२), चुडामण युवराज साेनवणे (वय ३५), रमेश सुकदेव शिरसाळे (वय ३८), स्वप्निल दिलीप खंडारे (वय २२), गुलाब वामन गायकवाड (वय ४०), प्रकाश सुकदेव शिरसाळे (वय ३६), नीळकंठ सुकदेव (वय ४५), हितेश ऊर्फ करण नीळकंठ शिरसाळे (वय १८) यांना एप्रिल राेजी अटक केली हाेती. त्यांच्या पाेलिस काेठडीची मुदत शनिवारी संपल्याने त्यांना न्यायाधीश ठाकूर यांनी न्यायालयीन काेठडी सुनावली. त्यानंतर संशयितांतर्फे अॅड. अजय सिसाेदिया यांनी जामीन अर्ज सादर केला. ताे अटी-शर्ती ठेवून मंजूर करण्यात अाला. सरकारतर्फे अॅड. हेमंत मेेंडकी, अॅड. एस.एम.कलंत्री यांनी काम पाहिले.