आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिरसोलीत पत्नीचा गळा अावळून खून, महागडी साडी अाणल्याचा राग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- शिरसाेली येथे माहेरी अालेल्या मुलीच्या सासू, नणंदला महागडी साडी अाणल्याचा राग अाल्याने शुक्रवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास पतीने पत्नीला मारहाण करीत गळा अावळून ठार केले. याप्रकरणी शनिवारी सकाळी मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून एमअायडीसी पाेलिस ठाण्यात वडिलांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला अाहे.

शिरसाेली येथील बाळू किसन पवार (वय ५०, मूळ रा. कातरवाडी, ता. नांदगाव) हा रामदास राजाराम पाटील यांच्या शेतात गेल्या तीन महिन्यांपासून सालदारकीचे काम करीत अाहे. त्याची माेठी मुलगी साेनी अर्जुन माेरे (वय २०, रा. कमाेतळा, मध्य प्रदेश) हिचे पती, नणंद अाणि सासू शिरसाेली येथे अाले हाेते. त्यांच्यासाठी पत्नी खटाबाई हिने हजार २०० रुपयांप्रमाणे तीन साड्या अाणल्या होत्या. याचा बाळू पवार संताप आल्याने दुपारी पत्नी खटाबाईला मारहाण केली; त्यानंतर रात्री ११ वाजता पुन्हा लाकडी दांडक्याने मारहाण खटाबाईचा साडीने गळा अावळून खून केला. शनिवारी सकाळी वाजता खटाबाईचे वडील नामदेव भील यांनी सिव्हलमध्ये दाखल केल्यावर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घाेषित केले.
बातम्या आणखी आहेत...