आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उधारी मागितली; बिअरशॉपीत राडा, यावल पाेलिस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावरील घटना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यावल- तालुक्यातील कोरपावली येथील सरपंच पतीने शहरातील बिअरशॉपमध्ये तोडफोड केली. याप्रकरणी यावल पोलिसात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. शेतकी संघाच्या व्यापारी संकुलात आठवडे बाजाराच्या दिवशी शुक्रवारी सायंकाळी हा प्रकार घडल्याने सुमारे अर्धा तास गोंधळ उडाला.

यावल पोलिस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर भुसाळ टी-पॉइंटजवळ शेतकी संघाचे व्यापारी संकुल आहे. तेथे असलेल्या बिअरशॉपीमध्ये कोरपावलीचे सरपंच पती संदीप सीताराम जावळे शुक्रवारी सायंकाळी बिअर पिण्यासाठी आले होते. त्यांच्याकडे मागील उधारीची रक्कम बाकी असल्याने व्यावसायिक प्रभाकर काशिनाथ वारके यांनी विचारणा केली. याचा राग आल्याने जावळेंनी दुकानातील दोन बिअरच्या बाटल्या त्यांच्या दिशेने मारून फेकल्या. तसेच दुकानतील साहित्य अस्ताव्यस्त फेकून तोडफोड केली. यात सुमारे एक हजार रुपयांचे नुकसान झाले. याप्रकरणी वारके यांच्या तक्रारीवरून यावल पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे. या घटनेने मात्र, शहरात खळबळ उडाली अाहे.