आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव: खून करणारा अाराेपी लपला काॅटमध्ये अन् पाेलिस पथक भाेपाळला रवाना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाचाेरा- चारचाकी वाहनाचा कट लागल्याच्या कारणावरून एका माथेफिरूने शुक्रवार, दि.२४ रोजी वाहनधारकावर चाकूहल्ला केल्याने त्याचा मृ‌त्यू झाला हाेता. मुख्य आरोपी त्याच्या साथीदाराचा शोध घेण्यासाठी पोलिस पथकाने संपूर्ण जिल्हा पिंजून काढला. इतकेच नव्हे तर पाेलिस पथक त्याच्या शाेधासाठी भाेपाळलाही रवाना झाले हाेते. परंतु प्रमुख अाराेपी प्रवीण पाटील शहरात असलेल्या त्याच्या अाजाेबांच्या घरातच काॅटमध्ये लपलेला अाढळून अाला. 
 
पाचोरा येथील भडगाव जामनेर रोडवर वरखेडी नाक्याजवळ शुक्रवारी रात्री १० वाजेच्या सुमारास किसन जोतीराम राठोड (रा.वाई) हा शहराकडून आयशर चारचाकी गाडी घराकडे घेऊन जात होता. या वेळी बाजूला उभा असलेल्या प्रवीण भीमराव पाटील यास आयशर गाडीचा कट लागला. त्यानंतर या दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला. त्याचे पर्यवसान नंतर हाणामारीत झाले. प्रवीण पाटील याने कंबरेचा धारदार चाकू काढून किसन राठोड याच्या पोटावर पाठीवर वार केले. या वेळी प्रवीण पाटील याचा साथीदार रवींद्र सोनवणे याने दोन्ही हाताने पकडून ठेवले. दरम्यान किसन राठोड हा जमिनीवर कोसळल्याचे लक्षात येताच प्रवीण पाटील रवींद्र सोनवणे यांनी घटनास्थळावरून पलायन केले. किसन राठोड याचा मृतदेह विच्छेदनासाठी आणण्यात आला असता अगोदर मारेकऱ्यांना अटक करा, अशी मागणी मयत राठोड याच्या नातेवाइकांनी केली. या वेळी आमदार किशोर पाटील, पोलिस उपअधीक्षक केशव पातोंड पाेलिस निरीक्षक नवलनाथ तांबे यांनी आरोपीस तत्काळ अटक करण्याचे आश्वासन दिले. 

दरम्यान, फरार आरोपी प्रवीण पाटील रवींद्र सोनवणे यांना शोधण्यासाठी पोलिस उपनिरीक्षक आर.आर.भोर, हवालदार प्रकाश पाटील, राहुल सोनवणे हे भोपाळ येथे रवाना झाले हाेते. त्याचवेळी सहायक पाेलिस निरीक्षक सचिन सानप त्यांच्या पथकातील कर्मचारी पाेलिस कांॅन्स्टेबल गजू काळे, राहुल बेहरे, राहुल साेनवणे यांनी अाराेपींचा शहर तालुक्यातच शाेध घेत हाेते. शहरातील त्यांच्या अाजाेबाकडे पाेलिसांनी वरवर जाऊन चाैकशी केली असता ते मिळून अाले नाही. त्याचवेळी घराची झाडाझडती घेत असताना अाराेपी काॅटमध्ये अाढळला. त्याला अटक करून भडगाव येथे नेण्यात अाले. 
बातम्या आणखी आहेत...