आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्काऊट-गाइड शिबिराचे पैसे न भरल्याने मुलींना वर्गात कोंडले, रुस्तमजी स्कूलचा प्रताप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
जळगाव - शिबिराचे पैसे न भरल्यामुळे दाेन मुलींना वर्गातच काेंडून ठेवत त्यांचे गुणपत्रकातही गुण कापल्याप्रकरणी रुस्तमजी स्कूलविरोधात शिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करण्यात अाली अाहे. या तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने बजावलेल्या नाेटीसला शाळेकडून कचऱ्याची टाेपली दाखवण्यात अाली अाहे. यासंदर्भात शिक्षणाधिकाऱ्यांना शाळा जुमानत नसल्याने संबंधित विद्यार्थिनींच्या पालकांनी थेट शिक्षण उपसंचालक यांच्याकडे तक्रार केली अाहे. दरम्यान, या प्रकारानंतर शाळेचे ना-हरकत प्रमाणपत्र रद्द करून मान्यताही काढून घेण्याची तयारी शिक्षण विभागाने सुरू केली आहे. 
 
रूस्तमजी शाळेचे फेब्रुवारी २०१७ मध्ये नाशिक येथे स्काऊट -गाइड शिबिर अायाेजित केले हाेते. या शिबिरासाठी विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी हजार १०० रुपयांची मागणी केली हाेती. हे पैसे भरल्यामुळे अाठवीच्या दाेन विद्यार्थिनींना वर्गात काेंडून ठेवत इतर विद्यार्थ्यांना मैदानावर खेळण्यासाठी साेडण्यात अाले हाेते. तर शिबिरास गेल्यामुळे त्या विद्यार्थिनींच्या गुणपत्रकावर गुण दिले नाहीत. शाळेत शालेय साहित्य विक्रीला बंदी असताना रूस्तमजी शाळेत सरसकट शाळाच पुस्तके विक्री करत अाहे. शाळेत शिक्षक-पालक समिती स्थापन करण्यात अालेली नसून यावर्षी ३५ टक्के फी वाढ करण्यात अाली अाहे. याबाबत पालक अमर सुंदरलाल लुल्ला यांनी शिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यानंतर माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी देविदास महाजन यांनी शाळेच्या मुख्याध्यापकांना मे महिन्यात नाेटीस बजावली हाेती. शाळेने अद्यापही या नाेटीसला उत्तर दिलेले नाही. 
 
शिक्षणाधिकारी जाऊनही मुख्याध्यापक भेटेनात 
नाेटीसला उत्तर दिले जात नसल्याने शिक्षणाधिकारी देविदास महाजन हे जुलै महिन्यात स्वत: रुस्तमजी शाळेत गेले हाेते. त्यांना देखील मुख्याध्यापक भेटले नाही. शाळेचे व्यवस्थापन शिक्षणाधिकाऱ्यांना जुमानत नसल्याने अमर लुल्ला यांनी अाता नाशिक विभागीय शिक्षण उपसंचालकांकडे तक्रार केली अाहे. 
 
शाळेचे ना हरकत प्रमाणपत्र, मान्यता रद्द करण्यासाठी शिफारस 
- संबंधित शाळेला नाेटीस बजावल्यानंतर देखील त्यांनी काहीही उत्तर दिलेले नाही. शाळेसंदर्भात दाखल झालेल्या तक्रारी गंभीर स्वरूपाच्या अाहेत. शाळेचे ‘ना -हरकत ’प्रमाणपत्र रद्द करून मान्यता रद्द करण्यासाठी शिक्षण संचालकांकडे अहवाल सादर करणार अाहाेत.
देविदास महाजन, शिक्षणाधिकारी, माध्यमिक विभाग 
बातम्या आणखी आहेत...