आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

किनगाव बुद्रुकच्या सरपंच, ग्रामविकास अधिकारी यांच्यावर अपहाराचा गुन्हा दाखल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
किनगाव ग्रामपंचायत कार्यालय. - Divya Marathi
किनगाव ग्रामपंचायत कार्यालय.

यावल (जळगाव)- 14 व्या वित्त आयोगाच्या निधीत अपहार प्रकरणी किनगाव बुद्रुकच्या (ता. यावल, जि. जळगाव) सरपंच ज्योती अशोक महाजन व तत्कालीन ग्रामविकास अधिकारी भास्कर चंद्रभान रोकडे यांच्या विरूध्द सोमवारी यावल पोलिसात अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांनी संगनमत करून तब्बल 19 लाख 25 हजारांवर डल्ला मारल्याचा आरोप आहे. तालुक्यातील सलग दुसऱ्या पंचायतीत अपहाराचा प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे.


राजकीय पटलावर तालुक्यात महत्व असणारी तालुक्यातील पश्चिम भागातील मोठी व 17 सदस्य असलेली पंचायत किनगाव बुद्रुक अाहे. या पंचायतीत सप्टेंबर 2015 मध्ये निवडणूक झाली. 17 पैकी 10 जागा जिंकत कॉग्रेसने वर्चस्व कायम राखले होते मात्र, भाजपकडून काँग्रेसचे माजी आमदार रमेश चौधरींना चेकमेट देत त्याच्या गटातील सदस्य फाेडून भाजपच्या ज्योती अशोक महाजन या 13 सप्टेंबर 2015 रोजी सरपंच पदावर विराजमान झाल्या होत्या तर दरम्यान 2016 मध्ये 14 व्या वित्त आयोगातुन गावात विविध विकास कामाकरिता शासनाकडून निधी उपलब्ध झाला होता. त्यात 28 जानेवारी 2016 ते 1 ऑक्टाेंबर 2016 दरम्यान तत्कालीन ग्रामविकास अधिकारी भास्कर चंद्रभान रोकडे यांनी सरपंच ज्योती अशोक महाजन यांच्या सोबत संगनमत करून वित्त आयोगातील 19 लाख 25 हजार 50 रूपयांचा निधीचा नेमुन दिलेल्या कामाकरिता उपयोग न करता स्वत:च्या फायद्याकरिता वापर केला तेव्हा या प्रकरणी ग्रामपंचायत सदस्य टिकाराम चौधरी यांनी तक्रारी केल्या तेव्हा या तक्रारींची आधी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व नंतर नाशिक विभागीय आयुक्तांनी चौकशी केली असता त्यात सरपंच व ग्रामविकास अधिकारी दोन्ही दोषी आढळले व त्यांच्या सुचनेवरून ग्रामविस्तार अधिकारी संजय तुळशिराम मोरे यांच्या फिर्यादीवरून शासकीय रक्कमेचा अपहार करून शासनाची फसवणूक केली म्हणुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे  पुढील तपास पोलिस निरिक्षक डी. के. परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अशोक आहिरे, हवालदार संजय तायडे, संजीव चौधरी करीत आहेत.


या प्रकरणी ग्रामविकास अधिकारी निलंबित
याच अपहार प्रकरणात गेल्या वर्षी ग्रामविकास अधिकारी भास्कर रोकडे यांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी निलंबित केले होते तसेच काही महिने निलंबित राहिल्यावर त्यांची बदली करण्यात आली होती.


काँग्रेसचा गट फोडून झाल्या होत्या सरपंच
काँग्रेसचा बालेकिल्ला व काँग्रेसचे माजी आमदार रमेश विठ्ठल चौधरी यांचे मुळ रहिवासी गाव किनगाव बुद्रुक आहे तेव्हा 2015 मध्ये भाजप व कॉग्रेस अशा सरळ लढतीत पंचायतीच्या 17 सदस्यांपैकी काँग्रेसचे 10 सदस्य निवडून आले होते मात्र, त्यातील दोन सदस्य फोडून भाजपच्या ज्योती अशोक महाजन सरपंच झाल्या होत्या.

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती


 

बातम्या आणखी आहेत...