आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरपावलीच्या माजी सरपंचासह ग्रामसेवकाविरुध्द सरकारची फसवणूक केल्याबद्दल गुन्हा दाखल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोरपावली (ता. यावल, जि. जळगाव) येथील ग्रामपंचायतीचे कार्यालय. - Divya Marathi
कोरपावली (ता. यावल, जि. जळगाव) येथील ग्रामपंचायतीचे कार्यालय.

यावल (जळगाव)- कोरपावली (ता. यावल, जि.जळगाव) येथील तत्कालीन सरपंच सविता संदिप जावळे व ग्रामसेवक सुनिल चिंतामण पाटील यांच्या विरूध्द 14 वित्त आयोगाच्या निधीत 8 लाख 46 हजार 500 रूपयांची शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

याच कारणावरून सरपंच सविता जावळे अपात्र व ग्रामसेवक सुनिल पाटील यांना निलंबित करण्यात आले आहे. सोमवारी (दि.20) येथील पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. 

 


कोरपावली (ता. यावल, जि. जळगाव) येथील तत्कालीन सरंपच सविता संदिप जावळे यांनी एप्रिल 16 ते जुन 16 या कालावधीत पती संदिप सिताराम जावळे यांचे नावे वेळोवेळी एक लाख 55 हजार रुपयाची रक्कम ग्रामपंचायतीच्या बँक खात्यातून काढली आहे. सरपंच यांनी संबधित काळात 8 लाख 46 हजार 500 रुपये काढून कर्तव्यात कसूर केल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पाठविलेल्या अहवात स्पष्ट झाल्यावरून विभागीय आयुक्तांनी सरपंच सविता जावळे यांना सरपंच पदासह सदस्य पदावरून अपात्र ठरविले होते. याच प्रकरणात ग्रामसेवक सुनिल चिंतामण पाटील यांना देखील निलंबित करण्यात आले होते. तेव्हा या सर्व प्रकरणात दोघा संशयितांनी शासनाच्या 14 व्या वित्त आयोगाच्या एकुण 8 लाख 46 हजार 500 रूपयाच्या निधीचा स्वत:च्या फायद्याकरिता वापर करीत शासनाची फसवणूक केली. याप्रकरणी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी सुजय तुळशीराम मोरे यांच्या फिर्यादीवरून यावल पोलिसात सोमवारी फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस निरिक्षक डी. के. परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरिक्षक योगेश तांदळे करीत आहेत. 

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो

बातम्या आणखी आहेत...