आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कॉलेजमधील छेडखानी; दोघा रोमिओंवर गुन्हा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - देवपुरातीलएका महाविद्यालयातील विद्यार्थिनीची छेड काढणा-या दोघांविरुद्ध देवपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल शनिवारी दुपारी हा प्रकार घडला होता.
यासंदर्भात पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार, तिच्या महाविद्यालयातील मोहसीन आणि त्याचा मित्र मोहंमद रिजवान यांनी तिची छेड काढली. याशिवाय तिचा मोबाइल क्रमांक मिळवून वारंवार त्यावर असभ्य असे एसएमएस टाकण्यात आले. तसेच भेटण्याबद्दल मैत्री करण्याचा प्रस्ताव देण्यात आला. काल शनिवारी सकाळी साडेअकरा ते दुपारी अडीच यादरम्यान हा प्रकार घडला. याशिवाय दोघांनी तिचा पाठलागही केला. महाविद्यालयाच्या परिसरात हा प्रकार घडला. याप्रकरणी पीडित मुलीच्या तक्रारीवरून मोहसीन मोहंमद रिजवान यांच्याविरुद्ध देवपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर दोघांना अटक करण्यात आली आहे.