आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Crimes News In Jalgaon, Death Body In Mehrun Dam Issue

मेहरूण तलावातील ‘तो’ मृतदेह मुंबईच्या महिलेचा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - मेहरूण तलावात 9 एप्रिल 2014 रोजी मृतावस्थेत आढळून आलेल्या अनोळखी महिलेची अखेर साडेतीन महिन्यांनंतर ओळख पटली. वत्सलाबाई शिवाजी सदावर्ते (वय 45) असे या महिलेचे नाव आहे. ती मूळ तळणी (ता.मौजेपुरी, जि.जालना) येथील रहिवासी असून गेल्या काही वर्षांपासून ती नवर्‍यासोबत मुंबईतील अंधेरी भागात राहत होती. पैशांच्या वादातून तिचा खून झाला असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी जालना जिल्ह्यातील हातवळणी या गावातील भगवान उघडे व त्याचा मुलगा ज्ञानेश्वर उघडे यांना संशयावरून ताब्यात घेतले आहे.

मुंबई येथे राहणारी ही महिला एप्रिलमध्ये औरंगाबादला कामानिमित्ताने आली होती, तेथूनच ती बेपत्ता झाली होती. त्यानंतर ती तळणी येथे मूळ गावी गेली असावी असे तिच्या कुटुंबीयांना वाटले होते. यावरून तिच्या मुलीने तळणी येथे जाऊन चौकशी केली असता ती आढळून आली नव्हती. या घटनेचा छळा एमआयडीसी पोलिसांनी लावला.
असे उलगडले प्रकरण
एमआयडीसी पोलिस ठाण्याचे कर्मचारी जालना एलसीबी कार्यालयात कामानिमित्त गेले होते. त्या ठिकाणी मिसिंगच्या डायरीत मृत वत्सलाबाईंचा फोटो त्यांनी पाहिला. हा फोटो जळगावातील अनोळखी अकस्मात मृत्यूतील महिलेशी मिळता-जुळता असल्याचे लक्षात आले. त्यांनी तो फोटो आणि जळगावातील मृत महिलेचा फोटो वत्सलाबाईंच्या आईला दाखवला. त्यावरून ओळख पटवली आहे.