आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगावातील अट्टल घरफोड्याला २० वर्षांनी करमाड जंगलातून अटक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जामनेर- २०वर्षांपूर्वी जळगाव शहरात अनेक ठिकाणी जबरी घरफोड्या करणारा फरार आरोपी भगवान दगडू गायकवाड यास नेरी पोलिसांनी करमाड जंगलातून अटक केली आहे. सदर आरोपी वैराग्याच्या वेशात फिरत असल्याचा गुप्त माहितीवरून नेरी पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले आहे.

भगवान गायकवाड या आरोपीने आपल्या सहकाऱ्यांसह जळगाव शहरात अनेक ठिकाणी जबरी घरफोड्या केल्या होत्या. त्या वेळीच पोलिसांनी घरफोड्या करणाऱ्या या गँगला अटक केली होती. मात्र, आरोपींची न्यायालयाने जामिनावर मुक्तता केली होती. त्यानंतर वारंवार वाॅरंट काढूनही आरोपी भगवान गायकवाड हा न्यायालयात हजर होत नव्हता. तेव्हापासून पोलिस त्याचा शोध घेत होते. मात्र, आरोपी गायकवाड याने वैराग्याचा वेश धारण करून करमाड जंगलात वास्तव्य केल्याची माहिती मिळताच नेरी औट पोस्टचे पोलिस नाईक विलास चव्हाण पोलिस हेड कॉन्स्टेबल अनिल सुरवाडे यांनी आरोपी गायकवाड यास शिताफीने अटक करून जामनेर पोलिस ठाण्यात हजर केले. जिल्हाभरातील ठाण्यांचे पोलिस आरोपीचा शोध घेत होते. पोलिस निरीक्षक नजीर शेख पोलिस उपनिरिक्षक बारकु जाने यांनी चव्हाण सुरवाडे यांच्या कामगिरीचे पोलिस ठाण्यात कौतुक केले.