आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दरोड्याच्या तयारीतील चाैघांना काेठडी, जळगावमधील घटना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- एमअायडीसी पाेलिसाच्या पथकाने १६ आॅगस्ट राेजी पहाटे ३.३० वाजेच्या सुमारास चार संशयितांना अटक केली हाेती. त्यांच्या पाेलिस काेठडीची मुदत शनिवारी संपली. त्यांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी बी.डी.गाेरे यांच्या न्यायालयात हजर केेले असता त्यांनी न्यायालयीन काेठडी सुनावली अाहे. त्यानंतर एमआयडीसी पाेलिसांनी त्यांना तत्काळ दुसऱ्या गुन्ह्यात ताब्यात मिळण्यासाठी अर्ज दाखल केला अाहे.

दरोड्याच्या तयारीत असणाऱ्या सलमान बाबू पटेल, टिपू सलीम शेख, इरफान शेख गुलाब, शेख तौसिफ शेख रियाजुद्दीन यांना एमअायडीसी पाेलिसांनी १६ अाॅगस्टला अटक केली हाेती. त्यांच्या पाेलिस काेठडीची मुदत शनिवारी संपली. मात्र, एमअायडीसी पाेलिसांनी संशयितांना बिलाल चौकातील रमेश सोनार यांच्या पूजा बेंटेक्स या दुकानातील ६९ हजार ४०० रुपयांचा ऐवज लांबवला होता. या चाेरीत ताब्यात मिळण्यासाठी अर्ज दिला अाहे. सरकारतर्फे अॅड. एस.एम.कलंत्री यांनी कामकाज पाहिले.

वृद्धाला लुटणाऱ्यादाेघांना काेठडी
अयाेध्यानगरातीलवृद्धाला रेल्वेस्थानक परिसरात तीन चाेरट्यांनी मारहाण करून ३६ हजारांचा एेवज लुटला हाेता. याप्रकरणी शहर पाेलिसांनी शुक्रवारी दाेघांना अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता, २२ अाॅगस्टपर्यंत पाेलिस काेठडी सुनावली. अयोध्यानगरातील मुकुंंद मदन भावसार (वय ६७) हे ११ ऑगस्ट रोजी रेल्वेस्थानक परिसरातील मानसिंग मार्केट येथे कामानिमित्त आले होते. घरी परतत असताना दोघांनी त्यांना मारहाण केली. त्यांच्या खिशातून मोबाइल, पाच हजार रुपये रोख सात ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी असा एकूण ३६ हजारांचा एेवज हिसकावून नेला हाेता. याप्रकरणी तिलक उर्फ पन्नालाल सारस्वत (वय २८, रा. गुरूनानकनगर) नईम सय्यद तुकडू सय्यद (वय २४, रा. गेंदालाल मिल) या चाेरट्यांना ताब्यात घेतले. सरकारतर्फे अॅड. एस. एम. कलंत्री यांनी तर संशयितांतर्फे अॅड. केदार भुसारी यांनी काम पाहिले.
बातम्या आणखी आहेत...