आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Criminal Cases Inquary Complete 100 Percent By Jalgaon Police

जळगाव जिल्ह्यातील दरोड्यांमधील सर्व गुन्ह्यात पोलिसांना 100 टक्के तपासात

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - जिल्ह्यात विविध मार्ग, दुकान व घरावर 2012 मध्ये 38 दरोडे पडले. त्यापैकी 28 दरोडे हे तांत्रिक स्वरूपाचे होते तर 10 दरोडे हे व्यावसायिक स्वरूपाचे होते. हे सर्व दरोडे उघडकीस आणण्यास पोलिस प्रशासनास यश आले आहे. हे दरोडे स्थानिक गुन्हे शाखेने उघडकीस आणले आहेत.

23 लाख 21 हजार 850 रुपयांचा ऐवज जप्त
दरोड्याच्या घटना घडल्यानंतर पोलिसांना जितके काम लागते तितके काम इतर कोणत्याही गुन्ह्यात लागत नाही. त्यामुळे अशा घटना उघडकीस आणणे हे एक प्रकारचे मोठे आव्हानच असते. मात्र जळगाव जिल्हा पोलिस दलाने हे आव्हान पेलत सर्व घटना उघडकीस आणल्या नाही तर मोठी रिकव्हरीदेखील जमा केली आहे. यात व्यावसायिक 10 दरोड्याच्या घटनांमध्ये 27 लाख 35 हजार 37 रुपयांचा ऐवज लंपास झाला होता. त्यापैकी 23 लाख 21 हजार 850 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.

सहा घटना एलसीबीकडून उघड
10 व्यावसायिक स्वरूपाच्या दरोड्याच्या घटनांपैकी रावेर, चोपडा, धरणगाव, मुक्ताईनगर, चोपडा शहर आदी सहा ठिकाणच्या घटना स्थानिक गुन्हा शाखेने उघडकीस आणल्या आहेत तर पारोळा पोलिस ठाणे हद्दीतील दोन, मुक्ताईनगर, एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील प्रत्येकी एक अशा चार घटना स्थानिक पोलिस ठाण्यांनी उघडकीस आणल्या आहेत.

चालू वर्षातीलही दोन्ही गुन्हे उघड
2013 या वर्षात दरोड्यांच्या दोन घटना घडल्या होत्या. त्यापैकी एक घटना स्थानिक गुन्हे शाखेने तर दुसरी घटना मेहुणबारे पोलिसांनी उघडकीस आणली आहे. या दोन्ही घटना व्यावसायिक स्वरूपाच्या होत्या. या घटनांमध्ये 44 लाख 40 हजार 600 रुपयांचा ऐवज लंपास झाला होता. त्यापैकी 31 लाख 29 हजार 250 रुपयांचा ऐवज पोलिसांनी रिकव्हरी केली आहे.

जिल्ह्यात 2013 मध्ये पडलेले दरोडे
पिंपळकोठा 53 लाख 22 हजार 860 (वसुली), 53 लाख (लंपास)

मेहुणबारे 17 लाख 6 हजार
(वसुली), 5 लाख 2 हजार 200 (लंपास)
दरोडा लंपास झालेला माल वसुली
रावेर ते बर्‍हाणपूर रस्ता 10 हजार 500 10 हजार
चोपडा ते लासूर रोडवर 40 हजार 500 27 हजार
धरणगाव ते अमळनेर रोड 2 लाख 80 हजार 86 हजार
पारोळा तालुक्यातील विचखेडा 26 हजार 850 23 हजार
मुक्ताईनगर कुर्‍हा रोड 1 लाख 35 हजार 25 हजार
कोथळी रोड 1 लाख 20 हजार 1 लाख 20 हजार
तरवाडे ते पारोळा 32 हजार 500 10 हजार
चोपडा शहर 89 हजार 200 30 हजार
एमआयडीसी 20 लाख रुपये 20 लाख