आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुख्यात गुंड गुड्ड्या खूनप्रकरणी विक्की गाेयरच्या काेठडीत वाढ; दोघे अद्याप फरारच

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - गुंड रफियाेद्दीन शेख उर्फ गुड्ड्या याच्या खून प्रकरणी विक्की उर्फ विक्रम गाेयर याच्या पाेलिस काेठडीची मुदत न्यायालयाने दाेन दिवस वाढवली आहे. त्याच्या पाेलिस काेठडीची मुदत शनिवारी संपल्याने त्याला न्यायालयासमाेर हजर करण्यात अाले हाेते. या प्रकरणी अन्य प्रमुख दहा अाराेपी पाच मदत करणाऱ्यांना यापूर्वीच न्यायालयीन काेठडी मिळाली अाहे. श्याम गाेयर, विजय गाेयर हे दाेेघे पिता-पुत्र पाेलिसांना सापडलेले नाहीत. 
 
गुड्ड्याच्या खून प्रकरणी १७ दिवसांनंतर मुख्य संशयित अाराेपी विक्की उर्फ विक्रम श्याम गाेयर (वय ३३) याला सटाणा तालुक्यातील मिताणे गावातून स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने अटक केली हाेती. त्याला १२ अाॅगस्टपर्यंत पाेलिस काेठडी देण्यात अाली हाेती. या प्रकरणात अातापर्यंत ११ मुख्य संशयित अाराेपींना अटक झाली आहे. त्यांना सुरुवातीला अाठ दिवस नंतर तीन ते चार दिवसांची पाेलिस काेठडी देण्यात आली होती. सध्या हे संशयित अाराेपी न्यायालयीन काेठडीत अाहेत. केवळ एकमेव अाराेपी विक्की गाेयर पाेलिस काेठडीत हाेता. या प्रकरणाचा तपास गेल्या अाठवड्यात एसअायटीकडे साेपविण्यात अाला अाहे. मात्र सर्वच अाराेपी हे न्यायालयीन काेठडीत असल्याने न्यायालयाच्या परवानगीशिवाय एसअायटीला त्यांची चाैकशी करता येत नाही. दरम्यान, श्याम गाेयर, विजय गाेयर हे पिता-पुत्र अद्यापही फरार अाहेत. त्यांचा ठावठिकाणा अद्याप लागलेला नाही. अामदार गोटे यांनी या प्रकरणाचा तपास मुंबई क्राइम ब्रंॅचकडे साेपविण्याची मागणी केली हाेती. मात्र त्याएेवजी एसअायटीची स्थापना केली झाली अाहे. एसआयटीच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची काही दिवसापूर्वीच माहिती घेवून पडताळणी केली होती. 
 
तपासाकडे सर्वांंचे लक्ष 
गुड्ड्याच्या खुनाच्या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाल्याने हा खून संपूर्ण देशभर गाजला. त्यामुळे आता या प्रकरणाच्या तपासाकडे सर्वांचे लक्ष लागलेले अाहे. या प्रकरणाचा तपास उपविभागीय अधिकारी हिंमत जाधव यांच्याकडे साेपविण्यात अाला हाेता. 
बातम्या आणखी आहेत...