आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुख्यात गुन्हेगार गुड्ड्याचा गाेळ्या झाडून निर्घृण खून; गाेयर गटातील 12 जणांविराेधात गुन्हा दाखल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे- सराईत, कुख्यात गुंड आणि अनेक गुन्ह्यातील अाराेपी शेख रफियाेद्दीन शेख शफियाेद्दीन उर्फ गुड्ड्या (वय ३३) याचा मंगळवारी सकाळी सव्वासहा वाजेच्या सुमारास निर्घृण खून करण्यात आला. त्याच्यावर आधी पिस्तुलामधून गाेळ्या झाडण्यात आल्या. त्यानंतर तलवार, काेयत्याने सपासप वार करण्यात आले. त्यामुळे तो जागीच ठार झाला. ही घटना पाराेळा राेडवरील गाेपाल टी हाऊससमाेर घडली. या प्रकरणी गाेयर गटातील बारा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे. टाेळी युद्धातून ही हत्या झाल्याचा पाेलिसांचा अंदाज अाहे. 

शहरातील पाराेळा राेड, अाग्रा राेडवर एकत्र येणाऱ्या कराचीवाला खुंट चाैकात गाेपाल टी हाऊस आहे. या ठिकाणी शेख रफियाेद्दीन शेख शफियाेद्दीन उर्फ गुड्ड्या (वय ३३,  रा. गरुड काॅलनी, देवपूर) हा मंगळवारी सकाळी चहा पिण्यासाठी स्कूटरवरून अाला हाेता. ताे चहा पीत असताना सव्वासहा वाजेच्या सुमारास या ठिकाणी अचानक अाठ ते दहा जण हातात तलवारी, काेयता घेऊन आले. या संशयितांनी गुड्ड्याला हाॅटेलच्या बाहेर ओढले. त्यानंतर त्याच्यावर पिस्तूलमधून  गाेळी झाडली तसेच  तलवार, काेयत्याने  सपासप वार करून त्याची निर्घृणपणे हत्या केली. घटनेनंतर गुड्ड्याचा मृतदेह गोपाल टी समोर रक्ताच्या  थाराेळ्यात पडलेला हाेता. घटनेनंतर मारेकरी पळून गेले. पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर गुड्ड्याचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलवला. त्यापूर्वी तब्बल एक तास मृतदेह रस्त्यावर पडून हाेता. गुड्ड्या हा महापालिकेच्या  वसुली विभागाला लावण्यात अालेल्या अागीत ताे मुख्य अाराेपी हाेता. महिनाभरापूर्वीच त्याला जामीन मंजूर झाला हाेता.

सीसीटीव्ही फुटेजने पटली अाेळख
सीसीटीव्ही फुटेजवरून या घटनेतील संशयितांची अाेळख पटल्यानंतर शेख फारुख फत्तू (फाैजी ) यांनी पाेलिसांत तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून विक्की श्याम गाेयर, राजेंद्र रमेश देवरे उर्फ भद्रा, भीमा रमेश देवरे, दादू रमेश देवरे, श्याम गाेयर, िवलास श्याम गाेयर उर्फ छाेटा पापा, विजय श्याम गाेयर उर्फ बडा पापा यांच्यासह तीन ते चार जण अशा एकूण दहा ते बारा जणांविरुद्ध शहर पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात अाला.
बातम्या आणखी आहेत...