आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाेलिसांनी नियंत्रण ठेवूनही कुख्यात गुंड गुड्ड्याच्या खुनाचा CCTV फुटेज व्हायरल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गोपाळ टीसमोर रक्ताच्या थारोळ्यात गुड्ड्याचा मृतदेह पडलेला होता. - Divya Marathi
गोपाळ टीसमोर रक्ताच्या थारोळ्यात गुड्ड्याचा मृतदेह पडलेला होता.
धुळे - कुख्यात गुंड गुड्ड्या उर्फ रफियाेद्दीन शेख याच्या खुनाचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल हाेणार नाही, याची कठाेर काळजी पाेलिसांनी घेतली. त्यासाठी पाेलिसांसह सगळ्याच यंत्रणेवर नियंत्रण अाणले. तरीही क्राैर्याची परिसीमा गाठणाऱ्या या निर्घृण खुनाच्या सीसीटीव्ही फुटेजची क्लिप शहरभर व्हायरल झाली. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण अाहे. मुळात खुनाच्या घटनेचा सर्व व्हिडिअाेच या क्लिपमधून व्हायरल झाला अाहे. त्यात मारेकरी अत्यंत त्वेषाने गुड्ड्यावर तलवारीचे घाव घालताना दिसत अाहेत. अगदी तलवार वाकल्यानंतरही संबंधित संशयित पुन्हा पुन्हा वार करताना त्यात दिसत अाहे. 
 
पाराेळा राेडवरील गाेपाल टी हाऊस येथे गुड्ड्या उर्फ रफियाेद्दीन शेख शफियाेद्दीन याचा काल मंगळवारी अाठ ते दहा जणांनी प्रथम गाेळी मारून नंतर तलवार इतर हत्याराने वार करून खून केला. या घटनेचे संपूर्ण चित्रण सीसीटीव्हीत कैद झाले. पाेलिसांनी घटनास्थळाचे फुटेज ताब्यात घेतले हाेते. पाेलिसांनी हे फुटेज बाहेर जाऊ नये, याची पूर्ण काळजी घेतली. त्यासाठी पाेलिस विभागातील कर्मचाऱ्यांवर कठाेर नियंत्रण अाणले. तरी बुधवारी दुपारनंतर घटनेची क्लिप साेशल मीडिया अाणि अनेकांच्या माेबाइलमध्ये शहरभर व्हायरल झाली. त्यात भद्रा हा गुड्ड्यावर कसे क्रूरतेने वार करताे हे दिसत अाहे. क्लिपिंग पाहिली गेल्याने शहरात दिवसभर हत्या अाणि क्लिपची चर्चा हाेती. चाैकाचाैकात गटागटाने यासंदर्भात चर्चा करून क्लिप पाहत असल्याचे दिसून अाले. मात्र पाेलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतल्यानंतरही क्लिप नेमकी बाहेर कशी अाली, असा प्रश्न अाता उपस्थित हाेत अाहे.
 
क्लिप व्हायरल झाल्याने त्यातील हत्येचा घटनाक्रम पाहून अनेकांच्या मनात धडकी भरत अाहे. क्लिपमध्ये गुड्ड्या हाॅटेलमध्ये असताना चार ते पाच जण प्रथम येतात. त्यात एकाच्या हातात पिस्तूल अाहे. गाेळी मारल्यानंतर काही जण हाॅटेलमध्ये घुसून त्याच्यावर वार करतात. याच वेळी हाॅटेलमधून काही जण बाहेर पळून जाताना दिसतात. हाॅटेलमधून गुड्ड्याला खेचून बाहेर अाणले जाते. त्या ठिकाणी इतर अाराेपी हत्याराने गुड्ड्याच्या ताेंडावर वार करतात.वार करून ते निघून गेल्यावर यातील एक जण येऊन पुन्हा अर्धमेला झालेल्या गुड्ड्याच्या अंगावर, ताेंडावर सपासप वार करताे. १० ते १२ वारनंतर गुड्ड्या गतप्राण झाल्याचे स्पष्ट दिसत असताना वार करणे सुरूच असतेे. एकूण २३ वार त्याच्याकडून करण्यात आले, असे दिसते. 
 
‘दिव्य मराठी’ ने डीवायएसपी हिंमत जाधवांना विचारलेले प्रश्न 
Q. क्लिप व्हायरल झाली अाहे का? 
A.
हाेय. अापल्यालाही काहींनी सांगितले. 
 
Q. पाेलिसांकडून ती व्हायरल झाली का? 
A. नाही, पाेलिसांकडून व्हायरल झालेली नाही. 
 
Q. अनेकांकडे ही क्लिप अाली कुठून? 
A.
क्लिप ही स्क्रीनवरील अाहे. डीअार पाेलिसांकडे अाहे. 
 
Q. क्लिपबाबत काही कारवाई करणार का? 
A.
पाेलिसांचा सहभाग अाढळल्यास निश्चित कारवाई हाेईल. 
 
Q. पाेलिसांकडून ही क्लिप काेणाकाेणाला दिली गेली? 
A.
तपासाच्या दृष्टीने काही जणांना देण्यात अाली अाहे. 
 
पुढील स्लाइडवर पाहा, गुड्ड्यावर तलवारीने वार करतानाचा थरारक CCTV फुटेज...
 
हे पण वाचा,