आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुख्यात गुंड गुड्ड्या हत्या प्रकरण : मारेकऱ्याची माहिती देणाऱ्याला 10 ते 50 हजारांचे बक्षीस जाहीर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - कुख्यात गुंड गुड्ड्याच्या हत्या प्रकरणामध्ये मारेकऱ्यांची माहिती देणाऱ्याला पोलिसांकडून  10 ते 50 हजारांचे बक्षीस जाहीर केले आहे. माहिती देणाऱ्याचे नावही गोपनीय ठेवले जाणार आहे.
 
गुड्ड्याचा खून आणि व्हायरल झालेली क्लिप यामुळे तीन दिवसांपासून शहरात वातावरण ढवळून निघाले अाहे. त्यात अाता पाेलिसांनी खुनाच्या सुपारीकडे लक्ष वळविले अाहे. एका प्रतिष्ठित राजकीय व्यक्तीच्या हालचालीवर लक्ष ठेवले जात अाहे. संबंधिताची गुड्ड्या उर्फ रफियोद्दीन शफियोद्दीन शेख याने सुपारी घेतली होती. त्याला दमही दिला हाेता. याची चाहूल लागताच सुपारी उलटविण्यात अाली, असा संशय पाेलिसांनी व्यक्त केला अाहे. एकीकडे मारेकऱ्यांचा सुगावा घेताना पाेलिसांनी राजकारणी व्यक्तीवरही पाळत ठेवली अाहे. त्याची इत्थंभूत माहिती हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे. 
 
शहरात गुन्ह्यांमध्ये अडकलेला सराईत गुंड गुड्ड्या हा रागीट-खुनशी स्वभावाचा होता. वाद झाल्यानंतर जागीच धमकावण्याचा त्याचा स्वभाव होता. शिवाय धमकीप्रमाणे त्याने काहींचा काटाही काढला. शहराच्या राजकारणात सक्रिय असलेल्या एका राजकारण्यावर त्याचा राग होता. काही दिवसांपूर्वी गुड्ड्या जामिनावर बाहेर आला. त्या वेळी एका मालमत्ता खरेदीची या राजकीय नेत्याने तयारी दर्शविली. मुळात याच मालमत्तेवर गुड्ड्याचा डोळा होता. त्यामुळे त्याचा जुना राग वाद उफाळून आला. त्याने दमदाटी सोबत संबंधिताला धमकीही दिली. तर दुसरीकडे राजकारणात डोईजड झालेल्या या व्यक्तीची सुपारी गुड्ड्याला देण्यात आली. त्याचा सुगावा संबंधित व्यक्तीला लागला. अशी चर्चा थेट पोलिसांच्या कानापर्यंत जाऊन पोहाेचली आहे. त्यामुळे तपासातून कोणतीही चूक राहू नये म्हणून आता त्या घटनेचा गुड्ड्याच्या खुनाशी धागा जुळवून पाहण्याचा प्रयत्न पोलिस करत आहेत.
 
गुड्ड्याला आपली सुपारी मिळाल्याची माहिती गुड्ड्याच्या प्रतिस्पर्धींनी या राजकीय पुढाऱ्यापर्यंत पोहाेचविली. त्यानंतर अवघ्या तीन ते चार दिवसांत गुड्ड्याचा खून झाला. त्यामुळे ही सुपारी गुड्ड्यावर उलटल्याचा संशय अाहे. पोलिसही आता या  दिशेने तपास करीत अाहेत. गुड्ड्याच्या खुनानंतर तिसऱ्या दिवशीही मारेकरी शोधण्यात पोलिसांना यश आले नाही. संशयित मारेकरी कुटुंबासह पसार झाले आहेत. पोलिसांनी शेजारी जिल्ह्यांमध्येही त्यांचा शोध सुरू केला आहे. त्यासाठी एक पथक नाशिकला रवाना झाले आहे. सायंकाळपर्यंत या पथकाच्या हाती संशयित लागले नव्हते. तर दुसरीकडे मारेकरी थेट परराज्यात पळाल्याचा अंदाज आहे. 

‘मेंटल’समर्थकाचा धिंगाणा : एकीकडेखुनाचा तपास सुरू असताना काल बुधवारी रात्री गुड्ड्याचे प्राबल्य असलेल्या चाळीसगाव रोड एेंशी फुटीरोड या ठिकाणी दगडफेकीची घटना घडली. तशी माहिती काही नागरिकांनी पोलिसांनाही दिली. यानंतर अनेक अधिकारी या ठिकाणी पोहाेचले. घटनेला आझादनगर पोलिसांनी दुजोरा दिलेला नाही. तथापि एका अधिकाऱ्याने मात्र यास अधिकृत दुजोरा दिला आहे. गुड्ड्या समर्थक मेंटल म्हणून संबोधल्या जाणाऱ्या एका समाजकंटकाने हा प्रकार केल्याची माहिती पोलिस देतात. 
 
क्लिप व्हायरल करण्यात पोलिसांचा हात : निर्घृणरीत्या झालेल्या या खुनाच्या एक, दोन नव्हे तर तीन क्लिपा मोबाइल टू मोबाइल व्हायरल झाल्या आहेत. अर्थात या तिघांमध्ये घटना एकच असली तरी स्पष्ट विस्तृत चित्रीकरणाचा तेवढा फरक आहे. मुळात पोलिसांच्या ताब्यात असलेली खुनासारख्या गंभीर गुन्ह्यातील क्लिप व्हायरल झालीच कशी असा प्रश्न निर्माण होत आहे. पोलिस दलातील काही कर्मचाऱ्यांनी ही क्लिप व्हायरल केल्याची चर्चा पोलिस गोटात आहे. यापूर्वी सीआयडीसारख्या गोपनीय विभागात काम केलेल्या एका कर्मचाऱ्याने तसेच अन्य एकाने मूळ सीसीटीव्ही फुटेजचे मोबाइलने चित्रीकरण केले होते. चित्रीकरण करताना साध्या कपड्यातील या पोलिसाची आरशामधील छबीही व्हायरल झाली आहे. 
 
गुड्ड्या करोडपती? : अवघ्या तीन दिवसांपूर्वी खून झालेल्या गुड्ड्याच्या प्रॉपर्टीचीही माहिती आता समोर आली आहे. मुंबई, ठाणे, पुणे, अहमदनगर, नाशिक या ठिकाणी त्याची मालमत्ता फ्लॅट आहे. शिवाय महागड्या कार दुचाकीचा तो शौकीन होता. त्याच्या खुनानंतर गुड्ड्याच्या एकूण प्रॉपर्टीचा विषयावर चर्चा सुरू झाली आहे. अर्थात ही मालमत्ता गुड्ड्याने काळ्या पैशातून जमा केली होती. 
 
भद्रावर झाली होती प्रतिबंधात्मक कारवाई : कधीकाळी गुड्ड्याचा मित्र नंतर हाडवैरी झालेला राज भद्रा यावरही गुन्हे दाखल आहेत. काही दिवसांपूर्वी एका छोट्या वादातून त्याला पोलिस ठाण्यात आणले होते. यानंतर त्याला वरिष्ठांसमोर उभे करण्यात आले होते. सीआरपीसी ११०नुसार प्रतिबंधात्मक कारवाई करून पोलिसांनी त्याला सोडले होते. त्यानंतर हाच राजभद्रा एवढा गंभीर गुन्हा करेल, असा विश्वास नव्हता असे पोलिस सांगतात. तर खुनाच्या तपासासाठी आता पोलिस संशयितांचे मागील रेकाॅर्डही तपासून पाहत आहेत. यातून संशयितांवर मोक्का अर्थात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायद्यानुसार प्रस्ताव पाठविण्याचा पोलिसांचा विचार आहे. तशी माहिती पोलिसांनी दिली आहे. 
 
पथक रवाना... 
- खून प्रकरणातील सर्व धागेदोरे तपासले जात आहेत. तपासासाठी पथक बाहेरगावी गेले आहेत. खुनाची क्लिप कोणी व्हायरल केली हे सांगता येणार नाही. त्यामागे पोलिस कर्मचारी असल्यास त्या दिशेनेही चौकशीही केली जाईल. त्यानंतरच कारवाईची दिशा ठरविली जाईल. -एम.रामकुमार, जिल्हा पोलिस अधीक्षक 
 
राष्ट्रवादीच्या गोयरचा संबंध कसा: आ.गोटे 
शहरात दिवसाढवळ्या खुनाची घटना घडली. ही घटना समर्थनीय नाही. गुड्ड्याच्या खुनाच्या घटनेत राष्ट्रवादीच्या गोयरचा संबंध कसा, असा प्रश्न आ.अनिल गोटे यांनी पत्रकान्वये केला आहे. गुंडगिरीमुक्त शहर करायला पाऊल पुढे टाकले आहे. मात्र काही राजकीय पक्ष गुंडांना हाताशी धरतात, असेही त्यांनी म्हटले. 
 
हे पण वाचा,