आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुंड गुड्ड्या खून प्रकरणातील पापाला जळगावातून अटक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- धुळ्यातील बहुचर्चित गुंड गुड्ड्या खून प्रकरणातील मुख्य संशयित विजय शाम गोयर ऊर्फ बडा पापा (३८) याला जळगावातून सोमवारी अटक करण्यात आली. मोबाइल लोकेशनमुळे गुड्ड्या पोलिसांच्या तावडीत सापडला.   

१८ जुलै २०१७ रोजी धुळे शहरातील कराचीवाला चौकात गुड्ड्याचा ऊर्फ रफीयोद्दीन शफियोद्दीन शेख याचा निर्घृण खून झाला होता. या प्रकरणातील मुख्य संशयित असलेला विजय गाेयर हा घटनेनंतर पसार झाला होता. सोमवारी सायंकाळी तो बसने शिर्डीहून जळगावात आला. धुळे गुन्हे शाखेच्या पथकाला ही माहिती मिळाल्यावर  पोलिस पथक जळगावला येण्याच्या तयारीत हाेते. तत्पूर्वी त्यांनी जळगाव पोलिस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल भास्कर पाटील यांना फोनवर माहिती दिली.  त्यानंतर त्यांनी त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर धुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
बातम्या आणखी आहेत...