आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाेलिसांच्या ताब्यातील अाराेपी गाेळीबारात ठार, अज्ञातांकडून खात्मा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो - प्रतिकात्मक - Divya Marathi
फोटो - प्रतिकात्मक
भुसावळ - भुसावळातील मल्ल माेहन बारसेंच्या खुनातील अाराेपी नट्टू चावरिया पाेलिस बंदाेबस्तात असताना त्याच्यावर बसमध्येच गाेळीबार झाला. या हल्लात नट्टू चावरियाचा मृत्यू झाला. मात्र त्याच्यावर गाेळीबार करणारा अाराेपी फरार झाला.

भुसावळ येथील जामनेर राेडवरील वाल्मीकनगरात माेहन बारसेंचा २ जुलै २०१५ राेजी निर्घृण खून झाला हाेता. त्यातील अाराेपी नट्टू चावरिया व गाेपाळ शिंदे हे दाेघे धुळे कारागृहात अाहेत. त्यांना न्यायालयात हजर करण्यासाठी चार शस्त्रधारी पाेलिसांच्या बंदाेबस्तात मनमाड-शेगाव बसमधून (एम.एच. १४ बीटी ४०८३) बुधवारी भुसावळात अाणण्यात येत हाेते. ही बस राष्ट्रीय महामार्गावरील नाहाटा चाैफुलीवर प्रवाशांना उतरवण्यासाठी २ वाजून १५ मिनिटांनी थांबली. त्याच दरम्यान, बसमध्ये दबा धरून बसलेला हल्लेखाेर उठला व त्याने गावठी पिस्तुलातून नट्टू चावरियाच्या छातीवर गाेळी झाडून पलायन केले. क्षणार्धात चावरिया रक्ताच्या थाराेळ्यात पडल्याने प्रवाशांनी भरलेली बस थेट बाजारपेठ पाेलिस ठाण्यात अाणण्यात अाली. त्यानंतर पाेलिसांच्या पथकाने जखमी चावरियाला तातडीने बाहेर काढून डाॅ. राजेश मानवतकर यांच्या हाॅस्पिटलमध्ये दाखल केले. प्रथमाेपचारानंतर त्याला रुग्णवाहिकेतून चाेख पाेलिस बंदाेबस्तात जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात अाले अाहे. जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असताना चावरियाचा मृत्यू झाला.

भुसावळात बंदाेबस्त वाढवला
गाेळीबाराच्या घटनेनंतर भुसावळच्या वाल्मीकनगरात चाेख पाेलिस बंदाेबस्त तैनात करण्यात अाला अाहे. बारसे खून प्रकरणातील दुसरा अाराेपी गाेपाळ शिंदे याला बाजारपेठ पाेलिस ठाण्यात ठेवण्यात अाले. जिल्हा पाेलिस अधीक्षक डाॅ. जालिंदर सुपेकर, अपर अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी तातडीने भेट देऊन घटनेची माहिती जाणून घेतली. डीवायएसपी राेहिदास पवार, शहर पाेलिस ठाण्याचे निरीक्षक बाळासाहेब केदारे, बाळासाहेब गायधनी यांनी जामनेर राेडवर गस्त सुरू केली अाहे.

पाेलिसांचे कडे भेदले
खुनातील अाराेपी नट्टू चावरिया व गाेपाळ शिंदे हे दाेघे चार पाेलिसांच्या बंदाेबस्तात बसलेले हाेते. मात्र, तरीही हल्लेखाेराने बसमध्ये गाेळीबार केल्याने यंत्रणेला घाम फुटला अाहे. धुळे कारागृहातून हे अाराेपी ज्या पाेलिस पथकाच्या ताब्यात हाेते, त्यात सहायक फाैजदार अंकुश शिरसाठ, जयकुमार चाैधरी, सुभाष ठाकूर व संजय चव्हाण यांचा समावेश हाेता. गर्दीमुळे बसमध्ये त्यांना हल्लेखाेरावर शस्त्र राेखता अाले नाही. परिणामी हल्लेखाेर दुचाकीने पसार झाल्याचे पाेलिसांकडून सांगण्यात येत अाहे.
बातम्या आणखी आहेत...