आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सट्टाकिंग संतोष पाटीलच्या शोधार्थ पोलिस सरसावले

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - बालाजीपेठेतील खोंडे कुटुंबीयांवर हल्ला करणा-या संतोष पाटीलच्या काळ्या कारनाम्यांचे वृत्त ‘दिव्य मराठी’त प्रसिद्ध होताच पोलिस अधीक्षक प्रकाश मुत्याल यांनी या प्रकरणाचा आढावा घेतला. संतोषच्या मुसक्या आवळून त्याला तत्काळ अटक करून समोर हजर करा, असे आदेश त्यांनी दिले.
सट्टाकिंग पाटीलला स्थानिक नगरसेवक नव्हे तर महाबळ भागातील एका नगरसेवकाचे पाठबळ लाभले असून तेथेच एका घरात तो लपल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी त्या नगरसेवकाच्या घराची झडतीदेखील घेतल्याचे समजते. पोलिसांनी जुने गाव परिसरात काही पंटर्सना ताब्यात घेऊन कोम्बिंग ऑपरेशन सुरू केले आहे.
संतोषचा शोध सुरूच - फरार संतोषच्या अटकेसाठी शनिपेठ पोलिस ठाण्याचे कर्मचारी दिवसातून एकदा त्या परिसरात चक्कर मारत असले तरी, स्थानिक गुन्हे शाखा व शहर पोलिस ठाण्याचे कर्मचारी त्याच्या शोधात आहेत. कलम 307 वाढविले असले तरी, उपद्रवी संतोषचा कायमस्वरूपी बंदोबस्त करणे गरजेचे आहे.
हद्दपारीची तयारी - संतोषवर कठोर कारवाईसाठी पोलिस सरसावले आहेत. त्याच्या हद्दपारीचा प्रस्ताव तयार करण्याचे कामदेखील सुरू असून, लवकरच हा प्रस्ताव उपविभागीय अधिका-यांकडे पाठविला जाणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. पोलिसांकडून त्याच्या खातरदारीचे दिवस आता संपल्याचे मानले जात आहे.
‘दादागिरी’ला कार्यकर्त्यांची जोड - लाल रंगाची पल्सर घेऊन शहरभर हिंडणारा संतोष सोबत काही टपोरी तरुण ठेवतो. व.वा.वाचनालयासमोरील प्रताप हॉटेल परिसरात संतोषबरोबर चिंग्या हा गुंड नेहमी दिसतो. धूमस्टाइल वाहने चालविणे, तरुणींचे नाव घेणे, कॉलेजसमोर मोठ्याने हॉर्न वाजविणे हे त्याचे उद्योग आहेत.
अशी होती दादागिरी - संवेदनशील बालाजीपेठसारख्या भागात संतोषने यापूर्वी परिसराच्या धार्मिक एकात्मतेला बाधा पोहोचेल असे कामदेखील केले आहे. बालाजीपेठेत कोणत्याही धार्मिक अथवा सामूहिक कार्यक्रमासाठी वर्गणी गोळा करताना सरळसरळ दादागिरी करणे, या भागात राहणा-या सोनेकाम करणा-या काही बंगाली कारागिरांवर दादागिरी करणे, त्यांच्याकडून हप्ते गोळा करणे, मारामारीत सहभागी होणे, भांडण सोडवून वचक निर्माण करण्याचा प्रयत्न करणे यासारख्या अनेक बाबी संतोषच्या बाबतीत नित्याच्याच ठरलेल्या होत्या.