आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुख्यात गुंडाची नाशिक कारागृहात रवानगी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - गणेशोत्सव,ईद आणि दुर्गोत्सवादरम्यान कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून पोलिस प्रशासनातर्फे हद्दपारीच्या कारवाई करण्यात आल्या. गुरुवारी कुख्यात गुंड सुरेश पुंडलिक ठाकरे (रा.कोळीपेठ) याच्यावर एमपीडीएची कारवाई करण्यात आली असून त्यास ताब्यात घेऊन नाशिक मध्यवर्ती कारागृहात रवाना केले आहे. तीन वर्षांत ठाकरेवर दुसऱ्यांदा एमपीडीएची कारवाई करण्यात आली आहे.

चोरी,खंडणीसह १९ गंभीर गुन्हे
ठाकरेच्याविरोधात खुनाचा प्रयत्न १, जबरी चोरी ३, खंडणी मागणी २, दुखापत २, घरफोडी २, चोरी ५, शस्त्राने वार करून दुखापत १, शस्त्रासह अंगावर धावून जाणे २, बेकायदेशीर तलवार बाळगणे असे गंभीर स्वरुपाचे १९ गुन्हे दाखल आहेत. तसेच अदखलपात्र गुन्हे ५, प्रतिबंधात्मक कारवाई ६, हद्दपारी आणि एमपीडीएची कारवाई अगोदर झालेली आहे. दहशत पसरवून वेगवेगळ्या पद्धतीने गुन्हे करण्याची ठाकरे याची प्रवृत्ती बळावत असल्याने तो उपद्रवी बनला होता. त्याच्यावर महाराष्ट्र झोपडपट्टी दादा, हातभट्टीवाले औषधीविषयक गुन्हेगार धोकादायक व्यक्ती, दृकश्राव्य कलाकृतीचे विनापरवाना प्रदर्शन करणे, याला आळा घालण्यासाठी एमपीडीएची कारवाई केली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रभाकर रायते यांनी दिलेला प्रस्ताव जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पाठवला होता. त्या प्रस्तावावर गुरुवारी निर्णय होऊन ठाकरेवर एमपीडीएची कारवाई करण्यात आली. त्याची गुरुवारी रात्री नाशिक येथील कारागृहात रवानगी करण्यात आली.