आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रॉम्प्टनने हाती घेतली विशेष वसुली मोहीम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - क्रॉम्प्टनला ठेंगा दाखवित वीजबिलांपोटी एक अब्जावधी रुपये थकल्याचे वृत्त ‘दिव्य मराठी’त प्रसिद्ध होताच क्रॉम्प्टन ग्रीव्हज कंपनीचे अधिकारी जागे झाले आहे. त्यानुसार त्यांनी मंगळवारी कर्मचार्‍यांची बैठक घेऊन शहरासह तालुक्यासाठी वसुली पथक नियुक्त करीत वीजगळती रोखण्यासाठी विशेष वसुली मोहीम राबविण्याचे नियोजन केले आहे.

वीज थकबाकीबाबत ‘दिव्य मराठी’ने वस्तुस्थिती समोर आणून देताच वीज कंपनीने तात्काळ वसुली मोहीम हाती घेतली आहे. पहिल्याच दिवशी म्हणजे मंगळवारी कोल्हे हिल्स परिसरात आकडे काढून मोहिमेस सुरुवात केली आहे. बुधवारपासून शहरासह तालुक्यात भरारी पथक नेमून थकबाकीदारांचे वीजकनेक्शन लागलीच काढले जाणार असून वीज बिले भरण्यासाठी अतिरिक्त काउंटर लावले जाणार असल्याचे क्रॉम्प्टनचे युनिट हेड डॉ.व्ही.पी.सोनवणे यांनी सांगितले.