आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘क्राॅम्प्टन’ला ‘गुड बाय’चा आदेश; कार्यालयातील साहित्य हलवले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - क्रॉम्प्टन ग्रीव्हज लिमिटेड कंपनीला सोमवारी दुपारी ‘गुड बाय’चे तर महावितरणाला कार्यभार सांभाळण्याचे आदेश प्राप्त झाले. त्यानंतर क्राॅम्प्टनची कार्यालयातील महत्त्वाची कागदपत्रे, कपाट, संगणकासह इतर साहित्य दुसऱ्या ठिकाणी हलवण्यासाठी धावपळ सुरू होती. तर दुसरीकडे महावितरणची कारभार घेण्यासाठी लगबग पाहण्यास मिळाली.

थकबाकी वसुलीसाठी क्रॉम्प्टनला फ्रंॅचायझी रद्द करण्याबाबत एक महिन्याची नोटीस दिली होती. ती मुदत आॅगस्टला पूर्ण झाल्यानंतरही एक दविसाची मुदतवाढ देण्यात आली होती. तरीदेखील कंपनीने थकबाकी भरण्यास प्रतिसाद दिल्याने अखेर महाराष्ट्र वीज मंडळाने सोमवारी क्राॅम्प्टनला ‘गुडबाय’ केले. या गोष्टीची कल्पना असल्याने महावितरण दोन दिवसांपासून कामाला लागले होते. महावितरण रवविारी रात्रीच क्रॉम्प्टनकडून कारभाराचा ताबा घेण्याच्या हालचाली गतिमान झाल्या होत्या.

लाइनमनची पालकमंत्र्यांशी भेट
क्रॉम्प्टनचीफ्रँचायझी रद्द झाल्याने २२० लाइनमन, ५० हेल्पर, ऑपरेटर, ७४ सुरक्षारक्षक आदी जवळपास ३५० कंत्राटी कर्मचाऱ्यांपुढे रोजगारीचा प्रश्न निर्माण झाला आहे. या कर्मचाऱ्यांनी पालकमंत्री एकनाथ खडसे यांची भेट घेऊन व्यथा मांडल्या आहेत. महावितरणकडील अन्यत्र गेलेल्या कर्मचाऱ्यांमधून पहिल्या टप्प्यात काही कर्मचारी परत बोलावले जाणार आहेत. दरम्यान, गरज पडल्यास या कंत्राटी कर्मचाऱ्यांमधील नविडक कर्मचाऱ्यांची नविडही केली जाणार आहे.

असे होईल हस्तांतरण
महावितरणनेताबा घेतला असला तरी आदेश येण्याची औपचारिकता बाकी होती. ती सोमवारी पूर्ण झाली आहे. मंगळवारी रात्री १२ वाजता २७ युनिटवरील रीडिंग घेऊन नव्याने वीज वितरणला सुरुवात होणार आहे. त्यामुळे ग्राहकांना पुढील बिल हे महावितरण कंपनीकडून प्राप्त होईल. महावितरणसह क्रॉम्प्टनचे अभियंते पुढील आदेश होईपर्यंत येथेच कार्यरत राहतील.

क्रॉम्प्टन कंपनीने गुंडाळला गाशा
करारकायम ठेवण्याच्या मानसिकतेत नसलेल्या क्रॉम्प्टन प्रशासनाची सोमवारी सकाळपासून कार्यालयातील महत्त्वाचे कागदपत्रे, कपाटे इतरत्र हलवण्याची तयारी सुरू होती. कंपनीचे महत्त्वपूर्ण कागदपत्रे, कपाटे, एसी, संगणक आदी साहित्य हे एमआयडीसीतील गोडाऊन गणपती हॉस्पिटल मागील कंपनीच्या विश्रामगृहात ठेवण्यात येत होते. दविसभर ही वाहतूक सुरू होती.
कार्यालयातील कपाट घेऊन जाताना क्रॉम्प्टनचे कर्मचारी.