आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

३०० क्रॉम्प्टन कर्मचाऱ्यांपुढे आता बेरोजगारीचे संकट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - क्रॉम्प्टनची फ्रँचायझी रद्द करण्याच्या निर्णयावर केवळ शिक्कामोर्तब बाकी असताना महावितरणने फ्रँचायझी ताब्यात घेण्याचे काम सुरू केले आहे. याबाबत शनिवारी महावितरणचे मुख्य अभियंता जे.एम.पारधी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी क्रॉम्प्टनच्या अधिकाऱ्यांसोबत कार्यालयात बैठक घेऊन परिस्थितीची माहिती जाणून घेतली. ही फ्रँचायझी रद्द झाल्यास सुमारे ३०० अधिकारी कर्मचाऱ्यांच्या नोकरीचा प्रश्न उभा राहणार आहे. पावणेचार वर्षांत महावितरणच्या तुलनेत ग्राहकांना पुरेशी सेवा देऊनही कंपनीत भ्रष्टाचाराला कुठेही वाव नसताना ग्राहकांनी आपली मानसिकता बदलल्याने हा अन्यायकारक निर्णय कर्मचाऱ्यांना भोगावा लागणार असल्याच्या भावना क्राॅम्प्टनच्या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केल्या.

महावितरणचा अॅक्शन प्लॅन
फ्रँचायझीरद्दची माहिती मिळताच क्रॉम्प्टन कार्यालयात याबाबतच्या चर्चेला उधाण आले आहे. मात्र, अद्याप याबाबतची कोणतीही लेखी माहिती आपणास प्राप्त नसल्याची बतावणी अधिकारी कर्मचारी वर्गातून केली जात आहे. दरम्यान, महावितरणचे मुख्य अभियंता जे.एम.पारधी, अधीक्षक अभियंता अशोक शिंदे, नोडल अधिकारी एस.एम.सदामते यांच्यासह दोन्ही कंपन्यांच्या वरिष्ठ
अधिकाऱ्यांमध्ये दुपारी बैठक झाली. यात ग्राहक सुविधा, मनुष्यबळ, कार्यालयाची व्याप्ती तसेच थकबाकी उपलब्ध साहित्यांची माहिती मुख्य अभियंत्यांनी जाणून घेतली. दरम्यान, शासनाच्या निर्णयानंतर वीज कंपनीच्या मुख्य कार्यालयाकडून येणाऱ्या अॅक्शन प्लॅननुसारच यात बदल केला जाणार आहे. कोणत्या सुविधा ठेवायच्या? यासह कर्मचारी नियुक्तीविषयीचे बदल करायचे, हे ठरवले जाणार असल्याचे मुख्य अभियंता जे.एम.पारधी यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले.

चतुर्थश्रेणीत बेरोजगारी वाढणार
शासनाकडूनमुलाखतीद्वारे क्रॉम्प्टनमधील सेवेत निवड झाली. मात्र, याचा बाऊ केला जात आहे. कंपनीने शिस्त लावण्याचा प्रयत्न केला. परंतु, तो अडचणीचा ठरत असल्याने विरोध वाढला. परिणामी, फ्रँचायझी बंद झाल्याने चतुर्थश्रेणीत बेरोजगारी वाढेल. यू.डी.चौधरी,ग्रामीणअभियंता

माझ्या सारख्या तरुणांचे नुकसान
नियमातनसतानाही वीजजुळणी मागणीचे प्रमाण कमी केले, हा दोष नाही. परिणामी, अनेक अपार्टमेंटमध्ये ट्रान्स्फाॅर्मर बसवल्याने अपघात टळतील. मात्र, यासाठी कंपनीला वाईटपणा घ्यावा लागला. यात माझ्यासारख्या तरुणांचे नुकसान होणार आहे. सचिनपाटील, वीज जुळणी अभियंता

खंडित वीजपुरवठ्याचे प्रमाण कमी
अद्ययावतट्रान्स्फॉर्मर स्वतंत्र फीडरमुळे खंडित वीजपुरवठ्याचे प्रमाण कमी झाले. औद्योगिकरणासह वीजगळतीवरही तीन वर्षांत नियंत्रण आणले. मात्र, याचा ताळेबंद कुठेही मांडला जात नसल्याचे दु:ख वाटते. मुकेशचौधरी, शहरअभियंता, क्रॉम्प्टन

शहरातरुचली नाही काॅर्पोरेट पद्धत
तक्रारसोडवण्यास थोडा उशीर होत असला तरी, ती कायमस्वरूपी सोडवण्याचा अधिक प्रयत्न असतो. मात्र, ग्राहक आपली मानसिकता बदलण्याचा प्रयत्न करीत नाही. काॅर्पोरेट पद्धतीचा स्वीकार करणे रुचत नसल्याचे दिसून आले. एस.के.पाटील,अभियंता

कर्मचाऱ्यांची एकनिष्ठता
क्रॉम्प्टननेग्राहकांसाठी विविध सेवासुविधा सुरू केल्या. मात्र, या सुविधांची माहिती जाणून घेऊन त्याचा उपयोग करून घेण्याची ग्राहकांची मानसिकता नसल्याने व्यवस्थापनाबद्दल ग्राहकांनी रोष कायम ठेवला. भ्रष्टाचाराला आळा बसल्याने काही दुखावलेही गेले असतील. रात्री विजेचे काम पूर्ण करण्यात क्रॉम्प्टन सरस ठरले आहे. मात्र, फ्रँचायझी बंदचा निर्णय घेतल्याने आपणावर संकट कोसळल्याच्या भावना क्रॉम्प्टन कर्मचाऱ्यांनी व्यक्त केल्या.

सद्य:स्थितीत क्रॉम्प्टनमध्ये महाव्यवस्थापक, युनिट हेड, वरिष्ठ अधिकाऱ्यांसह तसेच ३२ अभियंत्यांसह २४० लाइनमन, ६० हेल्पर यासह ४० कार्यालयीन कर्मचारी कार्यरत आहेत. यातील लाइनमन, हेल्पर डाटा ऑपरेटर हे सूर्या वत्स्य या कंपनीकडून आउटसोर्सिंग पद्धतीने भरण्यात आले आहेत. पावणेचार वर्षांपासून काम करीत असलेल्या या कर्मचाऱ्यांवर या निर्णयामुळे बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळणार असल्याची स्थिती आहे. यात वरिष्ठ अधिकारी अभियंत्यांना क्रॉम्प्टनच्या देशभरातील कुठल्याही कंपनीत समायोजित केले जाऊ शकते. मात्र, आउटसोर्सिंग पद्धतीने भरलेल्या ३०० कर्मचाऱ्यांना अन्यत्र नोकरी शोधावी लागणार आहे.