आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Crompton Started Recovery From High Profile Society

उच्चभ्रू वस्तीत क्रॉम्प्टनची धडक वसुली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- कोट्यवधींच्या वीजबिलांची थकबाकी वसूल करण्यासाठी क्रॉम्प्टनने आता बड्या ग्राहकांभोवती फास आवळला आहे. दुर्बल भागातील आकड्यांवर नियंत्रण आणल्यानंतर आता बड्या ग्राहकांचा शोध घेत वीज कंपनीने वसुलीची धडक मोहीम सुरू केली आहे. आदर्शनगर, गणपतीनगर या उच्चभ्रू वस्तीत सुरू असलेल्या कारवाईत शहरातील अनेक प्रतिष्ठित ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता.

कंपनी प्रशासनाकडून कानउघाडणी

50 कोटींवर विजेची थकबाकीमुळे तोट्यात आलेल्या क्रॉम्प्टनच्या अधिकारी वर्गास कंपनीच्या वरिष्ठ प्रशासनाने चांगलेच झाडल्याने अधिकारीवर्ग हात धुऊन वसुलीच्या मागे लागला आहे. दिवाळीपूर्वी वसुलीचे प्रमाण वाढविण्याचे उद्दिष्ट कंपनी प्रशासनाने अधिकारी वर्गास दिले आहे. परिणामी 10 हजारांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या घरगुती ग्राहकांची व 50 हजारांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या व्यावसायिक व औद्योगिक ग्राहकांची यादीच कंपनीने तयार केली आहे. यात शहरातील अनेक प्रतिष्ठित उद्योजक, डॉक्टर्स, राजकीय पदाधिकार्‍यांचा सहभाग आहे. थकबाकीच्या समीकरणामुळे फीडरनिहाय भारनियमनापासून जळगावकर नागरिक वंचित आहेत. प्रामाणिक वीज ग्राहकांना आपला हक्क मिळावा, यासाठी वसुलीही योग्य प्रमाणात आणणे गरजेचे आहे. परिणामी उशिरा जाग आलेल्या खासगी वीजपुरवठा कंपनीने ही मोहिम हाती घेतली आहे.