आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्राॅम्प्टन ग्रीव्हजकडून शहरात छुपे लोडशेडिंग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - जळगावच्या तापमानाने चाळिशी गाठली असून नागरिक हैराण झाले अाहेत, असे असतानाही राज्याच्या विद्युतभार केंद्राचे कोणतेही अादेश सूचना नसतानाही क्राॅम्प्टन ग्रीव्हज् तर्फे शहरासह तालुक्यात गेल्या आठ दिवसांपासून छुप्या पद्धतीने लोडशेडिंग करण्यात येत अाहे. याबाबत आमदार गुलाबराव पाटील यांनी शुक्रवारी पद्मालय विश्रामगृहात क्रॉम्प्टनच्या अधिकाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला. त्यामुळे अाता याप्रश्नी ११ एप्रिलला बैठक बोलावण्यात अाली आहे.

दहावी बारावीच्या परीक्षेसाठी २६ मार्चपर्यंत सर्व ग्रुपसाठी लोडशेडिंग रद्द करण्यात आले होते. त्यानंतर विद्युतभार केंद्राकडून डी ग्रुपनंतरच्या उर्वरित ग्रुपमध्ये रात्रीचे लोडशेडिंग सुरू ठेवावे, यासंबंधीच्या कोणत्याही सूचना क्रॉम्प्टनला दिल्या गेल्या नव्हत्या. मात्र, या आदेशाचे उल्लंघन करून कंपनीने डी-ग्रुप नंतरच्या सर्व ग्रुपसाठी रात्रीचे लोडशेडिंग सुरूच ठेवले. त्यामुळे शहरातील अर्ध्या भागासह संपूर्ण तालुका हा आठ दिवसांपासून रात्रीच्या लोडशेडिंगचा भार सोसत आहे. लोडशेडिंग करण्याबाबत विद्युतभार केंद्राकडून दररोज िनराेप येत असतो.
त्यानुसार लोडशेडिंगाची वेळ कमी-अधिक केली जाते. मात्र, लोडशेडिंग करण्याच्या कोणत्याही सूचना क्रॉम्प्टनला दिल्या गेल्या नाहीत. या माहितीला महावितरणच्या मुख्यअभियंत्यासह नोडल अधिकाऱ्यांनीही सकारात्मक दुजोरा दिला आहे. दरम्यान, नियमबाह्य लोडशेडिंगाविरोधात अामदार गुलाबराव पाटील यांनी शुक्रवारी पद्मालय विश्रामगृहात क्रॉम्प्टनच्या अधिकाऱ्यांना बोलावून चांगलेच खडेबोल सुनावले. या वेळी कंपनीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित नव्हते. अखेर ११ एप्रिलला क्रॉम्प्टन समवेत बैठकीच्या ठरावानंतर कर्मचाऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

भारनियमन रद्द असताना ते का केले जात आहे? याचा खुलासा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी मागितला आहे. मात्र, हे अधिकारी अंत्यत बेजबाबदार आहेत. कोणताही अधिकारी ही जबाबदारी घ्यायला तयार नाही. आज ते रद्द करण्याची भाषा करीत आहेत. ११ एप्रिलला होणाऱ्या बैठकीत याचा जाब विचारला जाईल. -गुलाबराव पाटील,अामदार

या ग्रुपवर लोडशेडींग
ग्रुप : सिल्कमिल,निमखेडी, लाकूडपेठ, मीराबाई, भवानीपेठ, नशिराबाद अर्बन, अासोदा, ममुराबाद, विठ्ठलपेठ, बळीरामपेठ, जिल्हापेठ, खेडी.

जी-१ग्रुप : बहिणाबाईउद्यान, मेहरूण, हरिविठ्ठलनगर, शिवाजीनगर, हुडको, खंडेरावनगर, चिंचोली, सावखेडा,वावडदा, म्हसावद, भोलाणे, भादली, फुपनगरी, कानळदा, डिकसाई, भोकर, विटनेर