आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन लाख शेतकऱ्यांना पीक विम्याचे कवच

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील लाख ७० हजार ८० कर्जदार बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी लाख २० हजार १७६ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचा विमा काढला आहे. त्याचा एकत्रित विमा हप्ता ६० कोटी ४८ लाख रुपये कंपनीने भरला आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना आता नैसर्गिक आपत्तीत झालेल्या पिक नुकसानीची भरपाई मिळण्यास मदत होणार आहे.

पंतप्रधान पीक विम्याच्या योजनेमुळे शेतकऱ्यांना पिकांशी निगडित विविध जोखमीपासून संरक्षण मिळून होणाऱ्या नुकसानीची भरपाई मिळणार आहे. नैसर्गिक आपत्ती प्रतिकूल हवामान या अचानक उद््भवलेल्या स्थितीत पिकांच्या नुकसानीपासून शेतकऱ्यांच्या पिकांचे संरक्षण होईल. पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत आधीच्या योजनांच्या तुलनेत शेतकऱ्यांना खूप कमी दर ठेवण्यात आला आहे. तसेच पीक विमा दराचा बोजाही कमी केला आहे. पूर्वीच्या पीक विम्याचा बोजा अधिक असल्याने शेतकरी पीक विमा काढण्याकडे दुर्लक्ष करीत होते. तसेच पीक विमा भरूनही त्यांना नुकसानीपोटी दाव्याची रक्कमही मिळत नव्हती. परंतु नवीन पीक विमा योजनेमध्ये शेतकऱ्यांसाठी कमाल विमादर सर्व खरीप पिकांसाठी टक्के आणि सर्व रब्बी पिकांसाठी १.५ टक्के ठेवण्यात आला आहे. त्याशिवाय फळे नगदी पिकांसाठी कमाल टक्के विमादर शेतकऱ्यांना भरावा लागला आहे.
खासगी बँकेच्या १५ हजार ३८९, ग्रामीण बँक ५०९, सहकारी बँकांच्या लाख ४७ हजार १६८ खातेदार शेतकऱ्यांनी लाख १३ हजार ३४३ हेक्टरील पिकांचा विमा काढला.

कर्जदार शेतकरी अधिक
हजार १४ बिगरकर्जदार शेतकऱ्यांनी पावणेसात हेक्टरवरील पिकांचा विमा काढला आहे. त्यांच्यासाठी ९२ कोटी १२ लाख ५९ हजार ९०८ रुपयांचे पीक विमा रक्कम ठेवली आहे.

...अशी मिळेल नुकसान भरपाई
उत्पादनातील तोट्याला कारणीभूत आग, वीज पडणे, वादळ, गारपीट, चक्रीवादळ, पूर, जलमय होणे, दरड कोसळणे, दुष्काळ, पिकावरील रोग आणि कीटक आदींमुळे होणारी पीक उत्पादनातील तोटे संरक्षित करण्यासाठी सर्वसमावेशक जोखीम विमा पुरवण्यात येणार आहे. संरक्षित पेरणीवर आधारित खर्च केल्यानंतर प्रतिकूल हवामानामुळे शेतकरी पेरणी करू शकला नाही, तर त्यांनाही २५ टक्क्यांपर्यंत विमा दावे मिळतील.
बातम्या आणखी आहेत...