आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Crop Loan News In Marathi, Rabbi Season, Farmer, Jalgaon

राज्याची पीककर्ज व्याजमाफीची योजना ठरणार फसवी!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - नुकसान झालेल्या पिकासाठी कर्ज घेतले असेल तरच त्या कर्जासाठी शासनाची ही योजना आहे. प्रत्यक्ष जिल्ह्यात रब्बीसाठी शेतकर्‍यांनी कर्जच घेतले नाही. त्यामुळे या योजनेचा फायदा शेतकर्‍यांना होणार नाही. शासनाने या योजनेचे लेखी आदेश उशिरा जाहीर केल्याने शेतकरी येत्या दोन दिवसात कर्ज भरू शकणार नसल्याने त्यांना जादा व्याजदर लागेल.

ज्या पिकांचे नुकसान झाले त्या पिकांसाठी घेतलेल्या कर्जासाठी कर्जव्याजमाफीची योजना असल्याचे सहकार आयुक्त मधुकर चौधरी यांनी स्पष्ट केले आहे. सुट्या वगळता आर्थिक वर्ष संपण्यासाठी अवघे दोन दिवस उरले असताना शासनाने उशिराने काढलेल्या कर्जव्याजमाफीच्या लेखी आदेशामुळे सहकार विभाग, बँका आणि जिल्हा प्रशासनदेखील संभ्रमात आहेत. खरिपाचे कर्ज घेतलेले परंतु रब्बीचे नुकसान झालेले शेतकरी या योजनेसाठी पात्र नसल्याचा निष्कर्ष बँकांनी काढला आहे. आदेशात संभ्रम असल्याने जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार चिमणराव पाटील यांनी सहकार आयुक्तांकडून माहिती घेतली. त्यावर त्यांनी हा खुलासा केला.

सुटीच्या दिवशी सुरू राहणार बँक : शासनाने उशिराने आदेश काढल्याने शेतकरी संभ्रमात आहेत. पीककर्जासाठी 31 मार्चपर्यंत मुदत आहे. परंतु रविवार आणि सोमवारी गुढीपाडव्याची सुटी असल्याने शेतकर्‍यांची धावपळ उडणार आहे. शुक्रवारी आणि शनिवारी शेतकर्‍यांची गैरसोय होऊ नये म्हणून बँकेच्या शाखा सुटीच्या दिवशीही सुरू ठेवण्याचा निर्णय जिल्हा बँकेने घेतला आहे.

आर्थिक मदतीचा पहिला हप्ता : गारपीटग्रस्त शेतकर्‍यांना आर्थिक मदत देण्यासाठी शासनाकडून जळगाव जिल्ह्यासाठी 25 कोटी रुपयांचा पहिला हप्ता देण्यात आला आहे. जिल्ह्यासाठी एकूण 148 कोटी रुपयांची गरज आहे. 1 लाख 60 हजार 802 शेतकर्‍यांना ही मदत दिली जाणार आहे.

शासनाकडून फसवणूक : कर्जव्याजमाफी, कर्जाचे पुनर्गठण या सारखे शब्द वापरून शासनाने शेतकर्‍यांची फसवणूक केली आहे. प्रत्यक्षात या योजनेचा फायदा होण्याऐवजी शेतकर्‍यांमध्ये संभ्रम निर्माण करण्यात आला आहे. यामुळे शेतकर्‍यांचे नुकसान होणार आहे. शेतकर्‍यांनी रब्बीचे कर्जच घेतले नसेल तर त्याचा फायदा तरी कसा मिळेल. याबाबत शासनाने नव्याने निर्णय घेतला पाहिजे, असे जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार चिमणराव पाटील यांनी सांगितले.

शेतकर्‍यांचे नुकसान
रब्बीत झालेल्या नुकसानीचा फायदा खरिपाच्या पीककर्जासाठी मिळणार नाही, हे स्पष्ट सांगण्याऐवजी शासनाने संभ्रमात टाकणारे आदेश काढले आहेत. दरम्यान, जळगाव जिल्ह्यात केळी आणि ऊस वगळता इतर रब्बी पिकांसाठी शेतकर्‍यांनी कर्ज घेतले नसल्याने त्यांना या योजनेचा फायदा होणार नाही.

पीककर्जाची स्थिती
1825.99 कोटी खरिपात वाटप झालेले कर्ज
900 कोटी रुपये शासनाच्या घोषणेमुळे वसुली थांबलेली एकूण रक्कम

काय आहे परिपत्रकात
एखाद्या शेतकर्‍याचे खरिपाच्या पिकांचे 50 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाल्याचा पंचनामा करण्यात आला असेल, अशा शेतकर्‍याच्या त्या पीककर्जाला मात्र सवलत मिळू शकणार आहे. अशा पिकांमध्ये केळीचाच समावेश आहे.

फायदा नव्हे, 108 कोटींचा फटका
व्याज सवलत मिळत असल्याने खरिपात घेतलेले पीककर्ज शेतकरी 31 मार्चपर्यंत भरत होते. या काळात वसुलीची टक्केवारी 80 टक्क्यांपर्यंत असते. या वर्षी शासनाने घोषणा केल्याने केवळ 50 टक्के शेतकर्‍यांनी कर्ज भरले. ही घोषणा फसवी ठरल्याने चार दिवसांनंतर दीड लाख शेतकरी थकबाकीदार ठरतील. त्यामुळे त्यांना व्याजापोटी 108 कोटी रुपयांचा फटका बसणार आहे.