आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दाेन चारचाकींना उडवणाऱ्या कार चालकाला जमावाचा चाेप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - बीएसएनएल कार्यालया समाेर साेमवारी दुपारी वाजता स्वातंत्र्य चाैकाकडून पांडे डेअरी चाैकाकडे जाणाऱ्या कारने दाेन चारचाकींना धडक दिली. या वेळी संतप्त जमावाने धडक देणाऱ्या कारच्या काचा फाेडून चालकाला चाेप दिला. या तरुणाने जिल्हापेठ पाेलिस ठाण्यात नुकसान भरपाई देण्याचे मान्य केल्यामुळे त्याच्यावर कुठलाही गुन्हा दाखल करण्यात अाला नाही.

गणेश काॅलनी परिसरातील इन्शुरन्स कंपनीचा सर्वेअर जतीन जानी (वय ३६) हा सोमवारी सकाळी त्याच्या कारने (क्र. एमएच-१७-एजे-०४०४) स्वातंत्र्य चाैकाकडून पांडे डेअरी चाैकाकडे जात हाेता. त्या वेळी पत्रकार काॅलनीतून सतीश सीताराम साळी (वय ५०) हे त्यांच्या चारचाकीने (क्र. एमएच-०४-बीएन-२१३०) बाहेर येत हाेते. त्या वेळी स्वातंत्र्य चाैकाकडून भरधाव कार येत असल्याचे त्यांना दिसले. त्यामुळे त्यांनी त्यांची गाडी रस्त्याच्या कडेलाच थांबवली. मात्र, कारचालक जानी याने साळी यांच्या कारला जाेरदार धडक दिली. त्यानंतर काही अंतरावर पांडे डेअरी चाैकाकडे जात असलेल्या अमिता पटेल (रा. गुजराथी गल्ली) यांच्या कारलाही (क्र. एमएच-१९-बीयू-००४९) मागून धडक दिली. त्यामुळे रस्त्यावर गर्दी झाली हाेती.

संतप्त जमावाने फाेडल्या गाडीच्या काचा
दाेनकारला धडक देऊन पळून जाण्याच्या तयारीत असणाऱ्या कारला नागरिकांनी अडवले. मात्र, कारचालक जतीन जानी खाली उतरत नसल्याने संतप्त जमावाने गाडीच्या काचा फाेडून त्याला बाहेर काढून चाेप दिला. त्या वेळी त्याने फीट अाल्याचे नाटक केले. जिल्हापेठ पाेलिस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळावर पाेहोचल्यानंतर त्यांनी जानी याला ताब्यात घेतले. त्यानंतर पाेलिस ठाण्यात त्याच्या मित्रांनी गाडीचे नुकसान भरपाई देण्याचे कबुल केले, त्यामुळे वादावर पडदा पडला.
बातम्या आणखी आहेत...