आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Crowd Looking For Lover Couple At Railway Station

प्रेमीयुगुलाच्या शोधासाठी रेल्वेस्थानकावर गर्दी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - रेल्वे स्थानक परिसरात सकाळी वाजता एखाद्या चित्रपटाच्या शूटिंगचा अनुभव नागरिकांनी घेतला. एका ‘हाय प्राेफाइल’ प्रेमीयुगुलाच्या शाेधासाठी पुण्यातून मुलीचे नातेवाइक जळगावात दाखल झाले हाेते. सुमारे ३० ते ३५ जणांच्या गर्दीने प्रवासी अचंबित झाले हाेते. या घटनेला शासकीय रेल्वे पाेलिसांनीही दुजाेरा दिला अाहे.

पुणे येथील एका लोकप्रतिनिधीची मुलगी पुण्यातीलच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्रतिनिधीचा मुलगा यांनी प्रेम प्रकरणातून मंगळवारी रात्री पलायन केलेे. ते रेल्वेने जळगावच्या दिशेने आल्याचा संशय मुलीच्या कुटुंबीयांना होता. शुक्रवारी रात्री प्रेमीयुगुलाच्या मोबाइल लोकेशनवरून त्यांचे शिर्डी मध्यरात्रीनंतर जळगावचे संकेत मिळत होते. त्यानुसार शनिवारी पहाटे पुणे येथून सुमारे १५ ते २० पॉश चारचाकी जळगाव रेल्वेस्थानक परिसरात दाखल झाल्या. गाड्यांमधून सुमारे ३०-३५ लोक उतरले. त्यांनी रेल्वे, हाॅटेल, लाॅजची तपासणी केली. मात्र, काहीही उपयाेग झाला नाही.