आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वर्दळीचे चौक बनले अपघात पॉइंट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चाळीसगाव - शहराचा वाढता विस्तार पाहता साहजिकच वाहनांची सं‌ख्या वाढली असून वर्दळीच्या प्रमुख चौकांवर त्याचा ताण पडतोय. अपघात पॉइंट ठरत असलेल्या चौकांवर वाहतूक पोलिसांची दृष्टी नसल्याने याठिकाणी बेशिस्त वाहतुकीने कळस गाठला आहे. सिग्नल चौक, कॅप्टन कॉर्नर, घाटरोड येथील चौक अधिक वर्दळीचे आहेत.

पालिका पोलिस प्रशासनाने अपघाती वळणे चौकांचे सर्वेक्षण करून सुरक्षेच्या उपाययोजना आखणे गरजेचे आहे. प्रामुख्याने अरूंद रस्त्यांमुळे वाहतूकीची कोंडी वाढत आहे. प्रमुख रस्ते चौकांभोवती गतिरोधक, झेब्रा क्रॉसिंग आवश्यकतेनुसार प्रमुख चौकांमध्ये सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करणे अपेक्षित आहे. यामुळे काही प्रमाणात वाहनधारकांना शिस्त लागेल अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. प्रमुख रस्त्यांवरील असलेल्या अपघाती चौकांमध्ये सिग्नल पॉइंट, न्यायालयासमोरील रस्ता, भडगावरोडवरील कॅप्टन कॉर्नर, खरजई नाका, सदानंद पॉइंट, पाटणादेवी चौफुलीवर वाहतुकीची सर्वात मोठी कोंडी होते याच ठिकाणी अपघाताचे सर्वाधिक प्रमाण वाढते आहे. या प्रमुख चौकांमध्ये पालिका प्रशासनाने गतिरोधक अथवा आवश्यक असलेल्या ठिकाणी सिग्नल यंत्रणा कार्यान्वित केल्यास सुसाट धावणाऱ्या वाहनधारकांवर अंकुश ठेवता येऊ शकतो. याच बरोबर अशा प्रमुख चौकांमध्ये वाहतूक पोलिस कर्मचारी निुयक्त करणे गरजेचे आहे. बहुतांशवेळा वाहतूक पोलिस नेमणूक दिलेल्या ठिकाणी हजर राहत नाहीत. त्यामुळे वाहनधारक बेशिस्तपणे सुसाट वाहने चालवतात. पोलिस प्रशासनाकडून सुसाट विनाक्रमांक तसेच लायसन्स नसणाऱ्या वाहनधारकांवर कारवाईचा बडगा उगारताना दिसतात. परंतु तरीदेखील वाहनधारकांना शिस्त लागत नाही. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवरदेखील पोलिसांनी सतत कारवाई करणे अपेक्षित आहे.

वाहनधारकांनीच शिस्तीचे पालन करणे गरजेचे
शहरात गेल्या दोन ते तीन वर्षांपासून वाहनांची संख्या वाढली आहे. त्यातच अवजड वाहनांचा प्रवेश डोकेदुखी ठरतोय. वाहनधारकांनी शिस्तीचे पालन केले तर प्रमुख चौकांमध्ये अपघात होणार नाहीत. मुख्य चौकांमध्ये सिग्नल यंत्रणा सुरू करावी, मद्य सेवन करून वाहन चालवू नये. वर्धमान धाडिवाल, व्यापारी, चाळीसगाव

वर्दळीच्याचौकात पोलिस नसल्याने बेशिस्तपणा
शहरातील वर्दळीच्या चौकांमध्ये वाहतूक पोलिस थांबवणे आवश्यक आहे. आवश्यक त्या ठिकाणी बॅरिकेट‌्स लावून अवजड वाहनांना बंदी हवी. अनेक चौकांसमोर शाळा, महाविद्यालय आहेत. किमान त्या ठिकाणी तरी ठराविक वेळेत वाहतूक पोलिसाची नियुक्ती हवी. वाहनधारकांनी देखील सहकार्य करावे. महेश देशपांडे, कर सल्लागार, चाळीसगाव

ब्रेकरसह चौक तयार करावा
कॅप्टन कॉर्नरजवळ चार रस्ते आजूबाजूला जातात. परंतु त्याठिकाणी कोणत्याही प्रकारचे ब्रेकर तयार केले नाहीत. त्यामुळे वाहनधारक सुसाट धावतात. अपघात टाळण्यासाठी येथे सर्कल चौक तयार केला पाहिजे. बाबुलाल महाजन, औषधविक्रेता

वेग मर्यादा आखावी
शहरातीलरहदारी मुख्य चौक तसेच शासकीय कार्यालय शाळा महाविद्याल्यासमोर यापूर्वी अनेकवेळा लहान मोठे अपघात घडले आहेत. परंतु पालिका पोलिस प्रशासनाने शहरात वाहनांची मर्यादा किती असावी, याबाबत कोणत्याही ठिकाणी सूचना फलक लावलेले नाहीत. त्यामुळे वाहनधारक सुसाट आपली वाहने चालवतात. अशावेळी अपघात होण्याची शक्यता असते. प्रशासनासमोर वाहतुकीला शिस्त लावण्याचे सर्वात मोठे आवाहन आहे. मुख्य चौकांचा श्वास मोकळा झाला पाहिजे.