आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मी उद्या जाणार आहे... सांगून, सीआरपीएफच्या जवानाची आत्महत्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राकेश मिठाराम मिस्तरी - Divya Marathi
राकेश मिठाराम मिस्तरी
चोपडा- तालुक्यातील मराठे येथील रहिवासी असलेले भोपाळ येथील मिलिटरी कँम्पमध्ये नोकरीस असलेल्या सीआरपीएफच्या जवानाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी अनेर धरणाजवळील शेतात घडली. 

भोपाळ येथे ११५ इंजिनिअरिंग कमांडो गाडीवर चालक म्हणून राकेश मिठाराम मिस्तरी(वाघ)(वय ३५)कार्यरत आहे. तो रजा घेऊन गावी आला होता. एप्रिल महिन्यात त्याला १५ दिवसांची रजा मिळाली होती. या कालावधीत त्याचा अपघात होऊन पाय मोडला होता. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याची मेडिकल रजा देखील मंजूर केली होती. या काळात वरिष्ठ कार्यलयाने ग्रामीण पोलिस स्टेशनला राकेश मिस्तरी खरोखर अपघातात जखमी आहे का अशी विचारपूस करून त्याला कामावर पाठवण्याबाबत पत्रव्यवहार केला होता. 

यासंदर्भात नायब तहसीलदार अधिकार पेंढारकर आणि ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस हेडकॉन्टेबल काशिनाथ पाटील हे समन्स बजविण्यासाठी शनिवारी (दि. १९) मराठे गावी गेले होते. या वेळी राकेश याच्याशी चर्चा करून कामावर रूजू होण्याबाबतचा तो समन्स दिला आणि त्यावेळी राकेशने, "मी उद्या जाणार आहे, असे सांगितले.' त्यानंतर तो समन्स स्वीकारला होता. मात्र, सोमवारी रात्री सात वाजेच्या सुमारास अनेर धरणाजवळील शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. तो नोकरीवर रूजू होता आत्महत्या का केली असावी, याचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. 

राकेश याचे चोपडा उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करून दुपारी अत्यंसंस्कार करण्यात आले. त्याच्या पच्यात आई, वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. 

आत्महत्येपूर्वी लिहिली चिट्ठी 
राकेशनेआपल्या जवळच्या मित्रांना फोन करून मी येतो आहे, असे सांगितले असून मृत्युपूर्वी आपल्या आर्थिक व्यवहाराची माहिती परिवाराला कळावी म्हणून चिठ्ठी लिहिली. ती चिठ्ठी पोलिसांना खिशात सापडली असून त्यात मी स्वखुशीने आत्महत्या करीत असल्याचे म्हटले आहे. 

सेवानिवृत्तीला दीड वर्षे बाकी 
राकेशमिस्तरी हा येत्या दीड वर्षात सेवानिवृत्त होणार होता.आतापर्यंत त्याने १४ वर्ष १० महिने नोकरी केली असून आता सध्या तो भोपाळ येथे वरिष्ठ अधिकाऱ्याच्या गाडीवर चालक म्हणून काम करत होता. 
बातम्या आणखी आहेत...