आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Cultural News In Marathi, Abisheka On 1008 Shiv Linga At A Time, Divya Marathi

1008 शिवलिंगांवर होईल एकाचवेळी अभिषेक !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महाशिवरात्रीनिमित्त शहरातील पांजरपोळ गोशाळेत 27 फेब्रुवारीला 1008 गोमय पार्थिव शिवलिंगांवर दुग्धाभिषेक करण्यात येणार आहे. त्यानंतर भाविकांना ते दर्शनासाठी खुले राहणार आहेत. शहरातील प्रभातफेरी समितीतर्फे या अभिषेकाचे आयोजन करण्यात आले आहे. पथमेडा (राजस्थान) गोधामचे गोऋषी दत्तशरणानंदजी आणि जोधपूर येथील राधाकृष्ण महाराजांची या वेळी प्रमुख उपस्थिती राहील. 1008 जणांना या अभिषेक आणि पूजेची संधी मिळणार असून, शनिवारपर्यंत 460 जोडप्यांनी व 440 वैयक्तिक जणांनी त्यासाठी नोंदणी केली आहे. महाशिवरात्रीला सकाळी साडेनऊ वाजता गणपतीपूजनाने सुरुवात होऊन नंतर कलशपूजन, कार्तिकस्वामींचे पूजन, शिवपूजन, पार्वतीपूजन, नागपूजन पांजरपोळ संस्थेतील नंदींचे पूजन होईल.
असे बनताहेत शिवलिंग?
अभिषेकासाठी लागणारे 1008 शिवलिंग बनवण्यासाठी रामेश्वर येथील पाणी, ओंकारेश्वर येथील नर्मदा नदीचे पाणी आणि वाळू, शेगाव येथील हत्तिस्थानाची माती, मेहरूण तलावाची माती, अलाहाबाद येथील त्रिवेणी संगमाचे पाणी व माती, मुंबईच्या समुद्राची वाळू, निमखेडी येथील शिवधाम मंदिराजवळील वारुळाची माती, पारोळ्याच्या किल्लय़ाची माती, नाशिक येथील गोदावरी नदीचे पाणी, गावरान गायींचे शेण आणि अश्वशाळेची माती यांचे मिर्शण तयार करण्यात आले आहे. शहरात दोन ठिकाणी हे शिवलिंग बनवण्याचे काम सुरू आहे.
पूजेसाठी लागणार्‍या वस्तू
या शिवलिंगांच्या दुग्धाभिषेकासाठी गावरान गायींचे 110 लिटर दूध वापरले जाईल. प्रत्येकाला 100 मिलिलिटर याप्रमाणे दूध मिळणार आहे. तसेच पंचामृतासाठी गायींचे 40 लिटर दूध, 20 लिटर दही, 10 लिटर मध, 5 किलो साखर आणि अडीच किलो गावराणी तुपाचा वापर केला जाईल.
गायींशी जुळेल नाते
4समाजातील जास्तीत जास्त लोकांचे गायींशी नाते जोडणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. शिवाय हा कार्यक्रम सामूहिक असल्याने जी ऊर्जा निर्माण होईल, तिचा मन:शांती आणि समाजाच्या कल्याणासाठी उपयोग होईल. महेशकुमार त्रिपाठी, आयोजक
गोमय पार्थिव शिवलिंग बनवण्याचे काम शहरात दोन ठिकाणी सुरू; दुग्धाभिषेकानंतर घेता येईल दर्शन.